Join us

ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 00:14 IST

सीए फाउंडेशन-इंटर आणि फायनलचे निकाल जाहीर करण्यात आले असून मुंबईचा राजन काबरा विजयी सीए फायनलमध्ये अव्वल ठरला आहे.

ICAI CA Result 2025: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने रविवारी मे २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी फायनल, फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी मुंबईतील राजन काबराने सीए फायनलमध्ये ऑल इंडिया रँक १ मिळवला आहे. त्याने परीक्षेत ६०० पैकी ५१६ गुण मिळवले आहेत. तर वृंदा अग्रवाल मे २०२५ मध्ये सीए फाउंडेशनची टॉपर ठरली आहे. तिने ४०० पैकी ३६२ गुण मिळवले आहेत. दिशा अनिश गोखरू ही सीए इंटरमीडिएटची टॉपर ठरली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राजन काब्राने वयाच्या २२ व्या वर्षी फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल या तिन्ही सीए परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत.

राजन काबराची गोष्ट नेहमीच्या टॉपर्सपेक्षा थोडी वेगळी आहे. बहुतेक लोक फक्त गुण मिळविण्याच्या शर्यतीत असतात,पण राजन प्रश्न विचारण्यावर, गोष्टी समजून घेण्यावर आणि हळूहळू शिकण्यावर विश्वास ठेवतो. त्याने आधी सीए फाउंडेशनमध्ये (जुलै २०२१) ३७८/४०० आणि नंतर सीए इंटरमिजिएटमध्ये (मे २०२२) ऑल इंडिया रँक १ मिळवला. राजनला नेहमीच व्यावहारिक गोष्टींमध्ये रस असतो.

सीए फाउंडेशन २०२५ परीक्षेत एकूण ८२,६६२ उमेदवार बसले होते, त्यापैकी १२,४७४ जण यशस्वी झाले. त्यातील पुरूष उमेदवारांची संख्या ४३,३८९ होती, त्यापैकी ७,०५६ जण यशस्वी झाले. त्याच वेळी, महिला उमेदवारांची संख्या ३९,२७३ होती, त्यापैकी ५,४१८ जण उत्तीर्ण झाले. देशभरातील ५५१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

ICICI CA टॉपर्स

सीए फाउंडेशन: १: वृंदा अग्रवाल

२: यज्ञेश राजेश नारकर

३: शार्दुल शेखर विचारे

सीए इंटरमीडिएट: १: दिशा आशिष गोखरू

३: देविदान यश संदीप

३: यमिश जैन

३ : निलय डांगी

सीए फायनल: १: राजन काबरा

२: निष्ठा बोथरा

३: मानव राकेश शहा

टॅग्स :सीएमुंबई