Join us

राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संजय सेठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 17:07 IST

सध्या डॉ. संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांची जागा संजय सेठी घेतील. डॉ. कविता गुप्ता यांची सीकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

मुंबईः राज्याच्या प्रशासकीय सेवेतील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी हे आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. डॉ. कविता गुप्ता यांची सीकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

सध्या डॉ. संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांची जागा संजय सेठी घेतील. मुखर्जी यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. एस एस देशमुख यांच्या निवृत्तीनंतर ते या पदाची सूत्रं स्वीकारतील. 

सध्या सीकॉमचे एमडी म्हणून काम पाहणारे डॉ. के एच गोविंदा राज यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालयाचे आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

अन्य बदल्या अशाः 

अनुप कुमार यादवः आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक

परिमल सिंहः राज्याचे विशेष विक्री कर आयुक्त

डॉ. एच यशोदः महिला आणि बालविकास आयुक्तपदी

ई रवेंद्रनः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती

एम जे प्रदीप चंद्रनः सामान्य प्रशासन विभाग उपसचिव (माहिती-तंत्रज्ञान)

डॉ. बी. एन. पाटीलः पर्यावरण विभागाच्या संचालकपदी

ए. बी धुलजः कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्तपदी

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाएमआयडीसी