Join us  

भाजपाबद्दल दहा दिवसांत निर्णय घेणार, नारायण राणेंचे अल्टिमेटम  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 2:33 PM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपामधील प्रवेश दीर्घकाळापासून रखडला आहे.

ठळक मुद्देभाजपाने आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अन्यथा येत्या दहा दिवसांत भाजपाबद्दल निर्णय घेईनअमित शहांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतही माझा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकलेला नाहीसध्या राज्यातील काही नेत्यांना बदनाम करण्यासाठी एक एजन्सी कार्यरत

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपामधील प्रवेश दीर्घकाळापासून रखडला आहे. युतीमधील सहकारी असलेल्या शिवसेनेचा आणि पक्षातील काही नेत्यांचा तीव्र विरोध असल्याने नारायण राणे यांना भाजपात प्रवेश देणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना शक्य झालेले नाही. दरम्यान, भाजपाने आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अन्यथा येत्या दहा दिवसांत भाजपाबद्दल निर्णय घेईन, असे अल्टिमेटम नारायण राणे यांनी दिले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी त्यांच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, अमित शहांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतही माझा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही. आता येत्या दहा दिवसांमध्ये मी भाजपाबद्दल पुढील निर्णय घेणार आहे. या दहा दिवसांनंतर मी भाजपामध्ये असेन की माझ्या स्वत:च्या पक्षात असेन हे स्पष्ट होईल.''  सध्या राज्यातील काही नेत्यांना बदनाम करण्यासाठी एक एजन्सी कार्यरत असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. ''एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत, मी त्या एजन्सीच्या म्होरक्यांना पकडलं आहे. त्यांना मी विचारलं की असं का करताय, तेव्हा त्यांनी काही जणांच्या आदेशावरून असं करावं लागतं, असं सांगितलं. अशी सात एक लोकांची टीम आहे. त्यात काही वकील आहेत, काही सीए आहेत. भुजबळांचाही त्याच टीमनं बळी घेण्याचा प्रयत्न केला होता. ती टीम कसं काम करते आणि ते विरोधकांना कसे ब्लॅकमेल करतात हे वेळ आल्यावर सांगेन, असंही राणे म्हणाले आहेत. ते खरं तर कोणासाठी काम करतात की, पैशासाठी काम करतात हे मी सांगू शकत नाही. नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी काम करत असल्याचा आरोप राणेंनी केला.

टॅग्स :नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षभाजपा