Join us  

'मी पुन्हा येईन'... विधिमंडळातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शानदार भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 9:42 PM

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप भाषण करताना मी महाराष्ट्राने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटले. ...

मुंबई - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी समारोप भाषण करताना मी महाराष्ट्राने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटले. मी कुठल्याही प्रयत्नाकडे सकारात्मकतेनं पाहिलं. त्यामुळेच, अनेक अडचणींना तोंड देऊन मी 15 ते 20 वर्षांपासूनची रखडलेली प्रश्न सोडवू शकलो, असे म्हणत गेल्या 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी मांडला. तसेच, जनतेचं आभार मानत पुन्हा तोच विश्वास घेत मी पुन्हा येईन, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

तू हसलास तर ते जळतील, तू रडलास तर ते हसतीलकाही नवं केलंस तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिलास तर श्राप म्हणतीलगमावलं तर दरिद्री म्हणतील, कमावल तर माज म्हणतीलपुढे निघालास तर मागे ओढतील, मागे राहिलास तर तुडवतीलतू हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतीलकाही केलं तरी काय केलं म्हणतील आणि नाही केलं तरी काय केलं म्हणतील...

मला माहितं होतं की, असं म्हटलं जाईल. त्यामुळे मी कधीही याचा विचार केला नाही. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला दैवत मानूनच मी गेली 5 वर्षे काम केलं. प्रामाणिकता आणि सकारात्मकता असेल तर आपण कुठलंही काम निश्चित करू शकतो, असे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मार्ग घेऊन मी काम केलं. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची दृष्टी, दिनदयालजींनी दिलेला अंत्योदयाचा विचार, अटलजींनी दाखवलेला सन्मार्ग, मोदीजींनी राज्य कारभार कसा चालवायचा हा घालून दिलेला वस्तूपाठ मनाशी बाळगून काम केलं. त्यामुळे विठु-माऊलीचा आशिर्वाद आम्हाला लाभला. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा राया, संत एकनाथ यांच्या वारीतील सहभागाप्रमाणे मीही या वारीत सहभागी झालो. गेल्या 5 वर्षात असंख्य कामं झाली, अनेक झाली नसती. मात्र, महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर प्रथम क्रमांकाच राज्य आहे. जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विदर्भातील मुद्दे, मराठवाड्यातील बराच बॅकलॉक पूर्ण केला. मराठवाड्यात वीज दिली. 

बाधाये आती है आये, घिरे प्रलय की घोर घटाँऐपावों के निचे अंगारे, सिरपर बरसे यदी ज्वालाए, नीच हातो मे हँसते हँसते, आग लगाकर जलना होगाकदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा

अटलींच्या या कवितेनं मला नेहमीच प्रेरणा दिली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.  मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मित्तीसाठीमी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठीनव महाराष्ट्राच्या निर्मित्तीसाठीमी पुन्हा येईन, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनिवण्यासाठीमाझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मित्तीसाठीमी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणीप्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रुप देण्यासाठी नव महाराष्ट्रनिर्मित्तीसाठी... मी पुन्हा येईन

असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाषण करताना, गेल्या 5 वर्षातील कामांचा आढाव घेत, सर्वांचे आभार मानले. तसेच, विधानसभा अध्यक्षांचे आभार आणि अभिनंदनही केले. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीमुंबईविधानसभा