मतदान करण्यास गेला अन् फसला!
By Admin | Updated: October 17, 2014 00:56 IST2014-10-17T00:56:03+5:302014-10-17T00:56:03+5:30
अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेला आणि दोन वष्रे गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिसांना गुंगारा देणारा रफिक शमशुददीन शेख (4क्) मतदान करायला आला आणि फसला.

मतदान करण्यास गेला अन् फसला!
मुंबई : अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेला आणि दोन वष्रे गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिसांना गुंगारा देणारा रफिक शमशुददीन शेख (4क्) मतदान करायला आला आणि फसला. शिवाजीनगरातील मतदानकेंद्रावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने शेखला ओळखले आणि पाठलाग करून त्याला बेडया ठोकल्या.
कमलेश हांडे असे या सतर्क पोलीस शिपायाचे नाव आहे. या कारवाईबददल खुदद पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी हांडेंना पाठ थोपटत शाब्बासकी दिली. तसेच तीन हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केले.
शेख हा येथील नगरसेविका नूरजहा शेख हिचा पती. तो केबल व्यावसायिकही आहे. मात्र त्याचा मूळ व्यवसाय गुन्हेगारी. भाऊ आतीफ अहमद याच्यासोबत शेख याने शिवाजीनगर गोवंडीत अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. खंडणी, हत्येचा प्रय}, हाणामारी याशिवाय परिसरात दहशत निर्माण करणो असे एकूण 16 गुन्हे शेखविरेाधात नोंद आहेत. गुन्हे दाखल होताच शेख अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेई. एका प्रकरणात तर तो सर्वोच्च न्यायालयार्पयत धडकला. मात्र सगळीकडे त्याचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे तो फरार झाला. गेल्या दोन वर्षापासून शिवाजीनगर पोलीस त्याच्या मागावर होते. त्याची माहिती काढून अनेकवेळा पोलिसांनी त्या त्या ठिकाणी सापळेही रचले. मात्र शेख त्यांच्या तावडीत सापडत नव्हता.
काल मतदानाच्या दिवशी मात्र शेख संजय नगर पालिका शाळेतील केंद्रावर मतदान करण्यास आला. याच केंद्रावर हांडे कर्तव्यावर होते. याआधी शेखला पकडण्यासाठी ज्या पोलीस पथकांनी त्यात हांडेंचाही समावेश होता. त्यामुळे हांडेंनी शेखला बघताक्षणी ओळखले. शेखनेही हांडे यांना पाहिले. हांडेंना पाहताच शेख आल्या पावली केंद्रातून बाहेर पडला. त्यानंतर बाईकवरुन पळू लागला. हांडेंनीही त्याचा पाठलाग सुरू केला. शिवाजीनगरातील गल्लीबोळातून पळताना एका ठिकाणी शेख बाईकवरून पडला. तीच संधी साधत मागाहून धावत आलेल्या हांडेंनी त्याची गचांडी आवळली.
शेख मतदानाला येणार याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नव्हती. ही कारवाई फक्त हांडे यांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली, अशी प्रतिक्रिया शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक वसंत वाखारे सांगत होते. त्यामुळे ही कारवाई फक्त हांडे यांची सतर्कता आणि प्रसंगावधान यामुळेच शक्य झाली, असे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, पोलीस आयुक्त मारिया काल शहरातील विविध भागातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी ठिकठिकाणी भेटी देत होते. ही कारवाई झाली तेव्हा ते गोवंडी भागातच होते. जेव्हा त्यांना हांडे यांच्या कारवाईची माहिती मिळाली तेव्हा ते संजय नगर पालिका शाळेत आले. त्यांनी हांडे यांची पाठ थोपटली. तसेच तीन हजार रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. (प्रतिनिधी)
तरीही मतदानाचा हक्क बजावला
हांडे यांनी पाठलाग सुरू केल्याने आरोपी शेख वेगात बाईक पिटाळत होता. या गडबडीत तो पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. हांडे यांनी शेखला पकडले आणि आपल्या अन्य सहका:यांना कारवाईची माहिती दिली. शेखला अटक करण्यात आली. मात्र मतदान असल्याने या पथकाने प्रथम शेख याला केंद्रावर नेले. तेथे त्याला मतदानाचा हक्क बजावू दिला आणि नंतर पोलीस ठाण्यात आणले.