Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आत्महत्या करायचीय, तत्पूर्वी..."; तरुणाच्या ट्विटनंतर पोलीस मदतीसाठी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 07:24 IST

‘आत्महत्येपूर्वी दानाची इच्छा’ नैराश्याने ग्रासलेल्या त्याने आत्महत्येचा मार्ग जवळ करण्याचे ठरवले.

मुंबई - आत्महत्या करायची आहे. तत्पूर्वी अवयवदान करू इच्छितो अशा आशयाचे ट्विट एका तरुणाने केले आणि पोलिसांचा धाबे दणाणले.  गुन्हे शाखेच्या कक्ष ३, ५ आणि ९ च्या पथकांनी वेगाने चक्रे फिरवत संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे ट्विट पाहिल्यानंतर पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषण करत माहिती मिळवली आणि कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून मुलाला ताब्यात घेतले. १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणावर घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करायची वेळ आली. तो छोट्या नोकऱ्या करत होता. मात्र, कर्जाचा डोंगर खूप असल्याने त्रस्त होता. नैराश्याने ग्रासलेल्या त्याने आत्महत्येचा मार्ग जवळ करण्याचे ठरवले. परंतु तत्पूर्वी अवयवदान करायचे असल्याने वरीलप्रमाणे ट्विट केले. पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला आई-वडिलांच्या हवाली केले. 

टॅग्स :मुंबई पोलीस