Join us

ओडिशातील चक्रीवादळग्रस्तांना मी मदत केली; तुम्हीही करा-अमिताभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:58 IST

‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले, शिवाय आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे.

मुंबई  - ‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले, शिवाय आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे. अमिताभ यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. आपल्या टिष्ट्वटमध्ये त्यांनी ‘मी मदत केली, तुम्हीही करा’ असे म्हणत देशवासीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. अमिताभ यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनाही मदत केली होती.सध्या पश्चिम बंगालमध्ये अनेक भागांत ‘फोनी’ वादळाचा प्रभाव आहे. खडगपूर, मिदनापूर पूर्व, मुर्शिदाबाद, उच्चर परगना आणि दिगा यांसारख्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. ९० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत आहेत. कोलकात्यातील विमानतळसेवा बंद करण्यातआली आहे.पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली असून, हानी सुरूच आहे. वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाला आहे. तेथेही जोरदार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार आहे.बिग बी म्हणतात...चाहे जितना भी हो प्रचंड तुफान,हर तुफान से लड़ेंगे हम,न अकेले तुमको छोड़ा था,न अकेले कभी छोड़ेंगे हम,जो घर उजड़ गए,उन्हें फिर से बसायेंगे हम,हर चोट पर मरहम लगाएंगे हम!!

टॅग्स :अमिताभ बच्चनफनी वादळ