Join us

'मुझे लडकी मिल गयी' कंडोम कंपनीने सलमानला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 14:02 IST

'मुझे लडकी मिल गयी', या सलमान खानच्या एका ट्विटने काल सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. चाहत्यांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला होता.

ठळक मुद्दे'मुझे लडकी मिल गयी', या टि्वटमुळे सलमानच्या आयुष्यात आत तिचा प्रवेश होणार असा सर्वांचा समज झाला होताअखेर सलमानला मिळालेली ती मुलगी कोण आहे?, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता.

मुंबई - 'मुझे लडकी मिल गयी', या सलमान खानच्या एका ट्विटने काल सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. चाहत्यांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला होता. वयाची पन्नाशी ओलांडलेला सलमान अजूनही अविवाहीत असल्यामुळे त्याच्या लग्नाबद्दल चाहत्यांनाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही बरीच उत्सुक्ता आहे. 

'मुझे लडकी मिल गयी', या टि्वटमुळे सलमानच्या आयुष्यात आत तिचा प्रवेश होणार असा सर्वांचा समज झाला होता. पण सलमानने लगेच दुसर टि्वट करुन सर्वांचाच भ्रमनिरास केला. सलमानला लग्नासाठी नाही तर आगामी 'लवरात्री' या सिनेमासाठी हिरोईन सापडली. सलमान लव्हरात्री या  सिनेमातून त्याचा मेहुणा आयुष शर्माला लाँच करणार आहे. 

पहिल्या ट्विटनंतर काही वेळातच सलमान खानवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला होता. अखेर सलमानला मिळालेली ती मुलगी कोण आहे?, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता. या पोस्टनंतर सलमान खानवर शुभेच्छांचा वर्षावदेखील झाला. यावेळी कंडोमच्या एका ब्राण्डने 'मुझे लडकी मिल गयी' हे सलमानचे टि्वट रिटि्वट करत शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेक टि्वटर युझर्स गंमतीशीर पद्धतीने रिअॅक्ट झाले. 

 

टॅग्स :सलमान खान