Join us  

मी सोनू सूदला मारहाण करू शकत नाही, मेगास्टार चिरंजीवीनं जोडले हात

By महेश गलांडे | Published: December 20, 2020 9:59 AM

सोनूची लोकप्रियता वाढली असून रिल लाईफमधील व्हिलन रियल लाईफमध्ये हिरो बनला आहे. त्यामुळेच, दाक्षिणात्य चित्रपटांचा मेगा स्टार अभिनेता चिरंजीवीने सोनू सूदला चित्रपटातही मारहाण करणार नसल्याचं म्हटलंय.

ठळक मुद्देसोनूची लोकप्रियता वाढली असून रिल लाईफमधील व्हिलन रियल लाईफमध्ये हिरो बनला आहे. त्यामुळेच, दाक्षिणात्य चित्रपटांचा मेगा स्टार अभिनेता चिरंजीवीने सोनू सूदला चित्रपटातही मारहाण करणार नसल्याचं म्हटलंय.

मुंबई - कोरोना महामारीच्या संकटात आणि लॉकडाऊन काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो परप्रांतीय कामगारांना मदत करून अनेकांची मने जिंकली. लॉकडाऊनमध्ये सुरू केलेल्या मदतीचे कार्य आता सोनूच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलाय. सोनूच्या ट्विटरवर चक्कर मारल्यास तुम्हाला त्याच्या कामाची आणि समाजाला वाहून घेतलेल्या कर्तव्याची जाणीव होईल. कधीकाळी चित्रपटातून व्हिलनचं काम करणाऱ्या सोनूची ही हिरोपंती त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही भावली आहे. त्यातूनच साऊथचा मेगास्टार अभिनेता चिरंजीवीने चक्क सोनू सूदला ऑनस्क्रीनही मारणं शक्य नसल्याचं म्हटलंय. 

सोनू गरीबांच्या, पीडितांच्या मदतीसाठी कायमच धावून आला आहे, दोन दिवसांपूर्वीही तो एका कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. वास्तविक, काल रात्री जोरात वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने दुचाकीस धडक दिल्याने एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती सोनू सूद याला समजताच त्याने मृतांच्या कुटूंबाशी संपर्क साधला आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. सतीश गुप्ता असं मृत दुचाकीस्वाराने नाव आहे.  या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी कार चालक तैफूर तन्वीर शेख याला ताब्यात घेतले आहे, तो वय 19 वर्षांचा आहे.

सोनूची लोकप्रियता वाढली असून रिल लाईफमधील व्हिलन रियल लाईफमध्ये हिरो बनला आहे. त्यामुळेच, दाक्षिणात्य चित्रपटांचा मेगा स्टार अभिनेता चिरंजीवीने सोनू सूदला चित्रपटातही मारहाण करणार नसल्याचं म्हटलंय. सोनूच्या सामाजिक कामामुळं चित्रपटासाठी त्याला अनेक दिग्दर्शकांकडून लीड रोल देण्यात येत आहेत. आचार्य सिनेमाच्या शुटींगवेळचा एक किस्साने सोनूने नुकताच सांगितला. चित्रपटातील एका दृश्यामध्ये सोनूला चिरंजीवकडून मारहाण करण्यात येणार होती. मात्र, चित्रपटातही मी तुला मारहाण करु शकत नाही. कारण, मी तसं केल्यास लोकं मला नावं ठेवतील, माझ्या इमेजला त्यामुळे धक्का बसेल, असे चिरंजीवीने म्हटल्याचे सोनूने सांगितलं. तसेच, एका दृश्यामध्ये सोनूच्या डोक्यावर चिरंजीव पाय ठेवतात, पण तोही सीन पुन्हा नव्याने बनविण्यात आला आहे. लॉकडाऊनमधील कामामुळे सोनूची प्रतिमा पूर्णत: बदलून गेली असून सोनू सूद यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 

सोनूच्या कार्याची दखल घेत, लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयने प्रकाशित केलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदचा पहिला क्रमांक आहे. या स्थानावर विराजमान होण्यासाठी 47 वर्षीय सोनू सूदला अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागली. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली, आणि लोकांना प्रेरित केलं, त्या सेलिब्रिटींचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. सोनू सूदनेही या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना आपल्या भावना बोलून दाखवल्या. आपल्या देशातील नागरिकांची मदत करणं हे माझं कर्तव्य असल्याचं मला लॉकडाऊन काळात लक्षात आलं, असा सोनूने सांगितलंय. 

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्याबॉलिवूडमुंबईचिरंजीवी