आले रे आले पोश्टर बॉईज
By Admin | Updated: July 27, 2014 01:01 IST2014-07-27T01:01:41+5:302014-07-27T01:01:41+5:30
दामिनी आणि आभाळमाया मालिकेने श्रेयसला खरी लोकप्रियता मिळवून दिली. इक्बाल, डोर, ओम शांती ओम अशा हिंदी सिनेमांतून बॉलीवूडमध्ये त्याने आपले बस्तान बसवले.

आले रे आले पोश्टर बॉईज
दामिनी आणि आभाळमाया मालिकेने श्रेयसला खरी लोकप्रियता मिळवून दिली. इक्बाल, डोर, ओम शांती ओम अशा हिंदी सिनेमांतून बॉलीवूडमध्ये त्याने आपले बस्तान बसवले. ‘सनई चौघडे’ चित्रपटानंतर आता पुन्हा मोठी ङोप घेत श्रेयसने ‘पोश्टर बॉईज’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
श्रेयस तळपदे - हिंदी सिनेसृष्टीत ब:यापैकी स्थिरस्थावर झाल्यावर मी कारकिर्दीच्या अशा वळणावर होतो, जिथे थोडासा ब्रेक घ्यावा असं वाटू लागलं होतं. सुभाष घई यांनी निर्मितीत सहकार्य केल्यामुळे ‘सनई चौघडे’ची निर्मिती केली होती. तो पहिलाच अनुभव असला तरी घईंसारखा मातब्बर निर्माता मागे असल्याने प्रत्यक्ष निर्मिती मी केली आहे असे घडले नव्हते. त्यानंतर इक्बाल, डोर असे चित्रपटही केले. नंतर गोलमाल, हाऊस फुल अशा विनोदी सिनेमांचे सिक्वेल केल्यानंतर नवं काय करावं याचा विचार सुरू होता. जीवनात एक पाऊल पुढे जावं असं प्रत्येकाला वाटतं, पण सुयोग्य संधी हवी असते. मला निर्माता होण्यास स्फूर्ती देईल, अशी काहीशी कथा मिळाली तर निर्मिती करावी असा विचार डोकवायचा. त्याआधी एका कामानिमित्त समीर पाटील आणि मी भेटलो होतो. त्या कामाचे काय झाले असे विचारायला समीरने फोन केला होता. पण ते होणार नाही असे सांगितल्यावर समीरने एक कथा लिहिल्याचे सांगितले. त्यासाठी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, पण मीच तेव्हा टाळाटाळ केली. मग फोनवरच कथेची वन लाइन सांगितल्यानंतर तर माझी उत्कंठा शिगेला पोहोचली. त्याला पुढे काय असे विचारल्यावर त्याने रोखठोकपणो प्रत्यक्ष भेटीत, पूर्ण कथा ऐकवीन असे म्हटले! मग आम्ही भेटलो. समीरने संपूर्ण कथा ऐकवली आणि त्या क्षणी जाणवलं, जिसकी मुङो तलाश थी, वो कहानी यही हैं. एका घटनेने तिघांचे आयुष्य बदलणारी गोष्ट मनापासून भावली. पण, मराठीत इतरही चांगले अभिनेते आहेत. हृषीकेश, अनिकेत यांच्यासारखे चांगले कलाकार असल्यामुळे मी या चित्रपटात अभिनय करण्याचा अट्टाहास धरला नाही. मात्र चित्रपटाच्या गाण्यात ती हौस भागवून घेतली.
मध्यंतरी शाहरूख खाननेही मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला होता, श्रेयस, पैशांसाठी कुणाच्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचलास तरी चालेल, पण सिनेमा स्वीकारताना मात्र तडजोड करू नकोस! त्याचा सल्ला पटला आणि थोडासा विश्रम घेत असताना अनाहुतपणो निर्माता बनलो! या चित्रपटात रोहित शेट्टी आणि फरहा खान यांनीही मित्रत्वाने काम केले आहे. त्यामुळेही मजा आली.
अनिकेत विश्वासराव - ध्यानी-मनी नसताना मी ऑडीशनसाठी गेलो. चित्रपटाची कथा पाच मिनिटे वाचल्यावर तिथल्या तिथे मी खूप मजा केली. या श्रेयस आणि समीरच्या म्हणण्यानुसार तर अक्षरक्ष: सुटलोच होतो. चित्रपटासाठी आवश्यक असणारा बाज पुरेपूर उतरवला. कसा कोण जाणो, मी त्या दिवशी अगदी खुलून, बेधडकपणो संवाद म्हटले आणि माझी निवड झाली. एका रांगडय़ा - गावंढळ आणि काहीशा इनोसंट अशा अजरुन जगताप या युवकाची ही भूमिका माङया चॉकलेटी इमेजपेक्षा खूप वेगळी आहे. ही व्यक्तिरेखा भावखाऊ आहे, त्याची बॉडी लँग्वेज, लूक, भाषा सगळेच वेगळे आहे, अशा प्रकारचा लहेजा मी याआधी केला नव्हता! थोडक्यात काय तर पोश्टर बॉईजमधला अर्जुन जगताप चक्क स्वयंघोषित हीरो आहे!
शब्दांकन - पूजा सामंत
लेस्ली लुईस पहिल्यांदाच मराठीत
चित्रपटाच्या संगीतासाठी अनेक मराठी संगीतकारांचा विचार केला. पण काही कारणांमुळे ते जमत नव्हते. काही दिवसांपूर्वी लेस्ली लुईस यांनी श्रेयसला नवीन गाणी ऐकायला येण्याचे आमंत्रण दिले होते. ते अचानक श्रेयसला आठवले आणि लेस्लींनी चित्रपटाला संगीत दिले तर, असा प्रश्न त्याच्या मनात आला.
मात्र बाकी टिमने हे कसे शक्य होईल, असे म्हणत श्रेयसला वेडय़ात काढले. पण प्रयत्न करायचाच, असे श्रेयसने ठरवले आणि लेस्लींना भेटायला गेला. त्यांच्या नवीन चाली ऐकण्याआधी श्रेयसने चित्रपटासाठी संगीत द्याल का, अशी विचारणा केली. लेस्लींना हा अनपेक्षित धक्काच होता.
त्यांनी चित्रपटाची कथा ऐकली आणि दोन-तीन दिवसांचा वेळ मागितला. त्यानंतर श्रेयसला बोलवून त्यांनी गिटारवर केलेली धून वाजवून दाखवली. ती ऐकल्यावर श्रेयसला ती जाम आवडली. हीच धून करायची असे नक्की झाले आणि ‘आले रे आले पोश्टर बॉईज’ या गाण्याची निर्मिती झाली. तीही अवास्तव मानधनाची अपेक्षा न करता.
सत्यघटनेवर आधारित चित्रपट -समीर पाटील
च्एका कार्यक्रमासाठी मी महाराष्ट्रभर फिरत होतो. त्याचदरम्यान विदर्भातील वर्तमानपत्रत एक बातमी वाचली होती. गावातील तीन तरु णांवर कुटुंब नियोजनाची शक्रिया झाल्याची पोस्टर्स लागतात! वास्तविक त्यांनी अशा प्रकारची शक्रिया केलेली नसतेच! या घटनेमुळे तीन व्यक्तींच्या आयुष्यात केवढे मोठे वादळ आले असेल? प्रत्यक्ष घडलेल्या या घटनेचे हे कथासूत्र घेऊन मी ‘पोश्टर बॉईज’ची कथा लिहिली.
च्स्वत: निर्मिती करण्याचे आर्थिक साहस शक्य नव्हते! दोनेक वर्षापूर्वी श्रेयस आणि मी एका वेगळ्या कामासाठी भेटणार होतो, ते काम होऊ शकले नाही. मात्र या चित्रपटाची वन लाइन ऐकवल्यावर त्याच्या पुढाकाराने पोश्टर बॉईजची इमारत उभी राहिली! दिलीप प्रभावळकरांसारखा मातब्बर अभिनेता त्वरित व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडला आणि जिवात-जीव आला!
च्दिलीप प्रभावळकर, हृषीकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे तिघे कथानायक आहेत. पूजा सावंत, नेहा जोशी या नायिका आहेत. या सगळ्यांनी चित्रपटात खूप चांगले काम केले आहे.