Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी एक सामान्य माणूस", विक्रम सखुजा यांना एएएआयचा जीवनगौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:23 IST

जाहिरात उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मुंबई : मॅडिसन मीडिया आणि ओओएचचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सखुजा यांना ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय)कडून दिल्या जाणाऱ्या  प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जाहिरात उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

जाहिरात आणि मार्केटिंग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पीयूष पांडे, प्रसून जोशी, एन. पी. सिंग, अरविंद शर्मा, मधुकर कामत, रमेश नारायण, सॅम बलसारा, शशी सिन्हा, अनुप्रिया आचार्य, प्रशांत कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हा पुरस्कार विक्रम सखुजा यांचे कामाप्रती पॅशन आणि संपूर्ण मीडिया उद्योगावर सकारात्मक परिणाम घडविण्याच्या त्यांच्या अथक कार्यपद्धतीची पोचपावती आहे, असे गौरवोद्गार मॅडिसन समूहाचे अध्यक्ष सॅम बलसारा यांनी काढले. या पुरस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त करताना विक्रम सखुजा यांनी सांगितले की, माझ्यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या ३१ विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा मला खूप आनंद झाला. मी एक सामान्य माणूस आहे.  मला या पुरस्काराने गौरवण्यात आले त्याबद्दल मी संपूर्ण उद्योगाचे खूप आभार मानतो.