पतीने केला पत्नीचा खून
By Admin | Updated: May 16, 2014 02:22 IST2014-05-16T02:22:37+5:302014-05-16T02:22:37+5:30
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भरत गोसावी आगरी (५५, रा. चिखले) याला घोलवड पोलिसांनी अटक करुन डहाणू न्यायालयात हजर केले.

पतीने केला पत्नीचा खून
बोर्डी : पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भरत गोसावी आगरी (५५, रा. चिखले) याला घोलवड पोलिसांनी अटक करुन डहाणू न्यायालयात हजर केले. आरोपींची रवानगी डहाणू सब जेलमध्ये करण्यात आली आहे. चिखले गावात राहणारी अरुणा भरत आगरी (५0) ही आरोपी भरत आगरीची पत्नी असून तिला दारुचे व्यसन होते. दारुमुळे अरुणाच्या शरीराची वाताहत झाली होती. संसारात लक्ष नव्हते. बायकोची दारु सोडविण्यासाठी आरोपी आग्रही होता. १२ मे रोजी भांडण विकोपाला गेले. आरोपीने हत्याराने मारहाण केल्याने अरुणाचा मृत्यू झाला. फिर्याद संबंधित दाम्पत्याच्या विवाहित मुलीने घोलवड पोलिसांना दिली. घोलवड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. डब्ल्यू. बांगर हे करीत आहेत. (वार्ताहर)