चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:56 IST2018-07-05T23:56:42+5:302018-07-05T23:56:55+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने केलेल्या आणि करणार असलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही नातेवाइकांना पाठवल्याचे उघड झाले आहे. यामुळे सोशल मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
_201707279.jpg)
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
मुंब्रा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने केलेल्या आणि करणार असलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही नातेवाइकांना पाठवल्याचे उघड झाले आहे. यामुळे सोशल मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राणी हिचा अजित पुजारी याच्याशी आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते डायघर गावातील पडले येथील साजसृष्टी इमारतीच्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावर राहत होते. याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिचे पालकही राहतात. नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीतील नोकरी दोघांनी सोडल्यानंतर तिने ब्युटीपार्लरचा व्यवसाय सुरू केला होता. तर, तो टेम्पो चालवत होता. डोंबिवलीमधील क्र ांतीनगर येथे राहत असलेल्या त्याच्या मावस भावाशी तिचे कथित अनैतिक संबंध सुरू असल्याचा त्याला संशय होता. यावरून, दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यातूनच बुधवारी पहाटे ४ वाजता त्याने तिच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने जोरदार प्रहार करून तिची हत्या केली. त्यानंतर, त्यानेही स्वयंपाकघरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने केलेल्या आणि करणार असलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही नातेवाइकांना पाठवला होता.
दरम्यान, अजित याच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्र ारीवरून राणी हिचे ज्याच्याशी कथित अनैतिक संबंध होते, त्या गणेश राव याला अजितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी ‘लोकमत’ला दिली.