प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

By Admin | Updated: May 28, 2014 02:31 IST2014-05-28T02:31:28+5:302014-05-28T02:31:28+5:30

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

Husband's blood with the help of a boyfriend | प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

पुणे : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकणी पत्नी व प्रियकरास अटक करण्यात आली आहे. नदिमा काशीम शेख (वय २५), वकील अहंमद अन्सारी (वय ३०, रा. दोघेही पठाणवस्ती, जनता वसाहत) अशी अटक आरोपींची नावे आहेत. काशीम हमीद शेख (वय २८, रा. पठाणवस्ती, जनता वसाहत) याचा खून करण्यात आला. प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून नदिमाने अन्सारीच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला. नदिमा व अन्सारीमध्ये जवळीक वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर काशीमचे नदिमाशी वाद होत होते. त्यातून काशीमला संपविण्याचा कट दोघांनी रचला. सोमवारी रात्री तो झोपला असताना त्याचा खून करण्यात आला. नदिमा व वकील यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर काशीम याचे नदीमा हिच्याशी वारंवार वाद होत होते. त्यातून काशीम याला संपविण्याचा कट दोघांनी रचला. सोमवारी रात्री तो झोपला असताना झोपेत त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. उपनिरीक्षक सावंत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Husband's blood with the help of a boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.