Join us  

'पतीकडून इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती, नकार दिल्यानंतर केलं दुसरं लग्न', मुंबईतील मॉडेलचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 11:40 AM

आपला मुस्लिम पती धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप मुंबईतील एका एक्स-मॉडेलने केला आहे. पती इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकत असून, आपल्याला बेदम मारहाण करत अत्याचार करत असल्याचा आरोप रश्मी शहबाजकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देआपला मुस्लिम पती धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचा एक्स-मॉडेल रश्मी शहबाजकर यांचा आरोपआपल्या पतीने मुलाचं अपहरण केल्याचीही तक्रारतक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई - आपला मुस्लिम पती धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप मुंबईतील एका एक्स-मॉडेलने केला आहे. पती इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकत असून, आपल्याला बेदम मारहाण करत अत्याचार करत असल्याचा आरोप रश्मी शहबाजकर यांनी केला आहे. इतकंच नाही तर आपल्या पतीने मुलाचं अपहरण केल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 वर्षांपूर्वी रश्मी शहबाजकर यांचं आसिफ शहबाजकरशी लग्न झालं होतं. त्यावेळी त्यांच्या पतीने लग्नानंतरही तू हिंदूच राहशील, धर्मपरिवर्तनासाठी कुठलाही दबाव टाकण्यात येणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षातच आसिफ शहबाजकर याने आपला शब्द फिरवला आणि आपल्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली असं रश्मी शहबाजकर यांनी सांगितलं आहे. 

 रश्मी शहबाजकर बोलल्या आहेत की, 'धर्मांतरासाठी नकार दिल्यानतंर आपल्या पतीने त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या हिंदू तरुणीशी लग्न केलं. यानंतर त्याने मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या पतीने दुस-या पत्नीलाही धर्मांतर करायला भाग पाडलं'. 

'आता माझा पती आमच्या घरातून मला बाहेर काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. माझ्या आयुष्याला खूप मोठा धोका आहे', असं रश्मी शहबाजकर यांनी सांगितलं आहे. आपल्यावर अत्याचार झाले असून, वारंवार धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'मी एक हिंदू असून, त्याच्या दबावाला अजिबात बळी पडली नाही', असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं. 

तक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 354, 509, 324, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस हे ‘लव्ह जिहाद’चं प्रकरण तर नाही ना, याचा शोध घेत आहेत. सध्या तपास सुरु आहे. 

टॅग्स :इस्लामहिंदूगुन्हा