पत्नीची हत्या करून पती फरार

By Admin | Updated: May 8, 2017 04:33 IST2017-05-08T04:33:05+5:302017-05-08T04:33:05+5:30

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना गोठीवली येथे घडली आहे, तर हत्या करून पळाल्यानंतर त्याने स्वत:

Husband absconded by wife's murder | पत्नीची हत्या करून पती फरार

पत्नीची हत्या करून पती फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना गोठीवली येथे घडली आहे, तर हत्या करून पळाल्यानंतर त्याने स्वत: शेजाऱ्याला फोन करून घरात पत्नीचा मृतदेह असल्याचे कळवले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोठीवली गाव येथे रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वैशाली जयेश महालिम (३०) असे मयत महिलेचे नाव असून, ती मूळची दिवा गावची आहे. सहा वर्षांपूर्वी तिचा जयेश याच्यासोबत प्रेमविवाह झालेला असून, त्यांना दोन मुले आहेत. जयेश हा मूळचा रत्नागिरीचा राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी वैशाली या घरातून निघून गेल्या होत्या. यानुसार, त्या हरवल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला होता, परंतु तेव्हापासून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होते. जयेश याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, असे रबाळे पोलिसांकडून समजते. याच संशयातून त्याने शनिवारी रात्री पत्नी वैशालीची हत्या करून पळ काढला. मात्र, रविवारी सकाळी त्याने शेजारच्या एका परिचयाच्या व्यक्तीला फोन करून आपल्या घरात पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती दिली.

Web Title: Husband absconded by wife's murder