निधीअभावी श्वानगणना ठप्प
By Admin | Updated: September 19, 2014 23:09 IST2014-09-19T23:09:33+5:302014-09-19T23:09:33+5:30
भटक्या कुत्र्यांनी मुंब्य्रातील एका शाळकरी मुलाला चावा घेतल्यानंतर ठाण्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.

निधीअभावी श्वानगणना ठप्प
अजित मांडके - ठाणो
भटक्या कुत्र्यांनी मुंब्य्रातील एका शाळकरी मुलाला चावा घेतल्यानंतर ठाण्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यात निर्बीजीकरणाच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने आरोग्य विभागाच्या एकूणच कामकाजाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मागील सव्वा वर्षात तब्बल चार हजार नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती आता माहिती अधिकारात उघड झाली आहे. यास आळा बसून केंद्राचा निधी मिळावा, या उद्देशाने पालिकेने कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आर्थिक स्थिती कोलमडल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव पालिकेच्या दप्तरी धूळखात पडला आहे.
निर्बीजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका आरोग्य विभागावर असताना भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचे निश्चित केले आहे. आजर्पयत केलेल्या शस्त्रक्रियांवर केंद्र शासनाच्या अॅनिमल वेल्फेअर बोर्ड यांच्याकडून 22 लाख 92 हजार 64क् रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु, बोर्डाकडून 4 सप्टेंबर 2क्13 रोजीच्या पत्रनुसार भटक्या कुत्र्यांची गणना झाल्याशिवाय अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएचओ संस्थेमार्फत जाहीर केलेल्या प्रचलित पद्धतीप्रमाणो स्थानिक लोकसंख्येच्या 2-3 टक्के मोकाट श्वानांची अंदाजे संख्या गृहीत धरून ठाणो महापालिका हद्दीतील सध्या शस्त्रक्रिया झालेल्या व शिल्लक (नर, मादी, पिल्लेवाली) असलेल्या एकूण कुत्र्यांची संख्या निश्चित करता येत नव्हती. म्हणून आता गणना करून एकूण कुत्र्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
परंतु, पालिकेत एलबीटी लागू झाल्यापासून आजही पालिकेची स्थिती सुधारलेली नाही. ठेकेदारांबरोबर आता पालिकेच्या विविध विभागांनाही त्याचा फटका बसला असून अत्यावश्यक सेवा देणा:या विभागांनाही निधी मिळावा, यासाठी पालिकेच्या आर्थिक विभागात खेटे घालावे लागत आहेत. याचा फटका आता आरोग्य विभागालाही बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी कुत्र्यांची गणना करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार झाला असून केवळ निधीच्या अभावामुळे तो आजही धूळखात पडला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाला छेडले असता निधी मिळाला तरच हा प्रस्ताव मार्गी लागेल आणि केंद्राचाही निधी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती या विभागाने दिली. 1 जानेवारी 2क्13 ते 3क् एप्रिल 2क्14 या कालावधीत कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या किती घटना घडल्या, त्यात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती ठाण्यातील दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागितली होती. त्यानुसार, सव्वा वर्षाच्या कालावधीत तब्बल चार हजार ठाणोकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती यात समोर आली आहे.
4जुलै महिन्यात मुंब्य्रातील एका शाळकरी मुलाला चार ते पाच कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर, निर्बीजीकरणाच्या कामाचाही मुद्दा पुढे आला होता. आरोग्य विभागाने 2क्क्4 पासून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
4पाच वर्षात 19,5क्क् कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. परंतु, या काळात कुत्र्यांच्या वाढीचे प्रमाण सहा टक्क्यांच्या घरात होते. त्यानंतर, हेच काम पालिकेने खाजगी संस्थेला दिले.
4आतार्पयत महापालिका आणि संस्थेच्या माध्यमातून 39 हजार 515 भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अद्यापही पाच ते सहा हजार कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया शिल्लक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
4स्थायी समितीच्या बैठकीत निर्बीजीकरणाचा मुद्दा गाजला होता.
स्थायी समिती सदस्यांनी थेट या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यांच्या मते निर्बीजीकरणाच्या कामासाठी पालिकेने सुमारे 5.5क् कोटींचा निधी खर्च केला आहे. प्रशासनाने या कामासाठी केवळ 1.5क् कोटीचा निधी खर्च केल्याचा दावा केला.