शेकडो वर्षापूर्वीची वसई पुन्हा अवतरणार!

By Admin | Updated: November 8, 2014 22:30 IST2014-11-08T22:30:26+5:302014-11-08T22:30:26+5:30

15 ते 23 नोव्हेंबरदरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर ‘माही वसई महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वसईतील ग्रामीण जीवन व पुरातन संस्कृती उलगडण्याचा प्रय} करण्यात येणार आहे.

Hundreds of years ago Vasai would be revived! | शेकडो वर्षापूर्वीची वसई पुन्हा अवतरणार!

शेकडो वर्षापूर्वीची वसई पुन्हा अवतरणार!

दीपक मोहिते - वसई
इतर भागांतून वसईत स्थिरावलेल्या नागरिकांना वसईचा खराखुरा इतिहास समजावा, या हेतूने वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवातर्फे 15 ते 23 नोव्हेंबरदरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर ‘माही वसई महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वसईतील ग्रामीण जीवन व पुरातन संस्कृती उलगडण्याचा प्रय} करण्यात येणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाची जोरदार तयारी सध्या सुरू असून 7 एकर जागेवर होत असलेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेकडो हात दिवसरात्र मेहनत करीत आहेत.
वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यंदाचा कला-क्रीडा महोत्सव भव्यदिव्य करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या महोत्सवापूर्वी वसईतील विविध समाजांचे राहणीमान, पारंपरिक व्यवसाय, खाद्य संस्कृती व पूर्वी शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे, वसई व अर्नाळ्याची प्रतिकृती, ग्रामीण भागातील जुने वाडे, विहिरीतून पाणीउपसा करणारे रहाट व शेतीसाठी वरदान ठरलेल्या शेतक:यांच्या बैलगाडय़ा इत्यादींबाबत माहिती देणारी मनमोहक दृश्ये साकारण्यात येणार आहेत. या महोत्सवामध्ये महिला बचत गट व लघुउद्योजकांनी तयार केलेली उत्पादने व खाद्यपदार्थ अधिक रंगत आणणार आहेत. महोत्सवाचे म्होरके मुकेश सावे, हेमंत म्हात्रे व प्रकाश वनमाळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या कामात जुंपले आहेत. या महोत्सवाच्या कामामध्ये आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितिज ठाकूर व आ. विलास तरे हे तिघेही जातीने लक्ष घालत आहेत. या माध्यमातून वसईकर जनतेला वसईचे यथार्थ दर्शन घडवण्याचा प्रय} असल्याचे आ. हितेंद्र ठाकूर यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.
 
4महोत्सवात वसई किल्ल्याची प्रतिकृती सुमारे 12 बाय 18 च्या आकारामध्ये उभारण्यात येणार आहे. या किल्ल्यातील भुयारी मार्ग, चर्चेस, मंदिरे याबाबतची माहिती महोत्सवास येणा:या नागरिकांना देण्यात येणार आहे. 7 दिवस चालणा:या या महोत्सवामध्ये विविध समाजांचे सण व पारंपरिक नृत्य दररोज सायंकाळी सादर करण्यात येणार आहे. 
 

 

Web Title: Hundreds of years ago Vasai would be revived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.