११ दिवसांत स्वाइनची शंभरी
By Admin | Updated: August 12, 2015 03:14 IST2015-08-12T03:14:30+5:302015-08-12T03:14:30+5:30
आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. गेल्या दोन दिवसांत ३२ रुग्ण आढळले असून, आॅगस्ट महिन्यातील स्वाइनच्या रुग्णांचा आकडा १०१ वर गेला आहे.

११ दिवसांत स्वाइनची शंभरी
मुंबई : आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. गेल्या दोन दिवसांत ३२ रुग्ण आढळले असून, आॅगस्ट महिन्यातील स्वाइनच्या रुग्णांचा आकडा १०१ वर गेला आहे. तर दुसरीकडे लेप्टोमुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. आॅगस्टमधल्या बळींची संख्या दोन झाली आहे.
कांदिवली येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे. ८ आॅगस्ट रोजी या महिलेचा नायर रुग्णालयात मृत्यू झाला. २४ जुलै रोजी या महिलेला लेप्टोची लागण झाल्याचे निदान झाले होते. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लेप्टोमुळे या महिलेच्या श्वसन यंत्रणेत बिघाड झाला होता आणि कीडनीलाही इजा झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात
स्वाइनचे १० रुग्ण आढळून आले आहेत.
जुलै महिन्यापासून मुंबईत पसरलेला स्वाइन अजूनही कमी झालेला नाही. आॅगस्ट महिन्यातही स्वाइनच्या रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता आहे. मंगळवारी स्वाइनचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आॅगस्ट महिन्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान स्वाइनचे २ हजार १३० रुग्ण आढळून आले असून, ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.