हुक्का पार्लरवर छापा, पाच जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:03 IST2018-10-21T06:03:05+5:302018-10-21T06:03:10+5:30
हुक्काबंदी केल्यानंतर छुप्या पद्धतीने हॉटेलमध्ये चालविणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

हुक्का पार्लरवर छापा, पाच जण अटकेत
मुंबई : हुक्काबंदी केल्यानंतर छुप्या पद्धतीने हॉटेलमध्ये चालविणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. डीएन रोड येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील सीताराम इमारतीमध्ये उस्तादी या हॉटेलमधील टेरेसवरील हुक्का पार्लरवर शनिवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला. हॉटेल मालक मुनीर अब्दुल हमीद बिरया (२९) आणि व्यवस्थापक इम्रान इकबाल खान (३६) यांच्यासह तीन वेटर्सवर एमआरए पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या वेळी ३० हुक्का पॉट, सुगंधी द्रव्य आणि ३८ पाइप्स आढळले. या प्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि तीन वेटर्सवर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली केली.