फायर रोबो बघण्यास मोठा प्रतिसाद
By जयंत होवाळ | Updated: April 19, 2024 23:12 IST2024-04-19T23:12:07+5:302024-04-19T23:12:27+5:30
हे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणासोबतच कुर्ला व मालाड येथे देखील आयोजित करण्यात आले.

फायर रोबो बघण्यास मोठा प्रतिसाद
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत पालिकेच्या अग्निशमन दलाद्वारे विशेष जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रदर्शनात फायर रोबोसह वॉटर मिस्ट, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, रेस्क्यू ट्रायपॉड स्टॅन्ड, कॉम्बिनेशन टूल यासारखी अत्याधुनिक व महत्त्वाची उपकरणे ठेवण्यात आली.
अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई अग्निशमन दलाबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती व्हावी आणि अग्निशमन दलात असणारी अत्याधुनिक उपकरणे जवळून बघता यावीत, या हेतूने जनजागृती प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दलाचा इतिहास आणि कर्तव्ये याबाबत देखील माहितीपूर्ण फलक प्रदर्शित करण्यात आले. हे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणासोबतच कुर्ला व मालाड येथे देखील आयोजित करण्यात आले.