‘माही वसई’ला उदंड प्रतिसाद

By Admin | Updated: November 17, 2014 00:13 IST2014-11-17T00:13:46+5:302014-11-17T00:13:46+5:30

शहरीकरणाच्या वेगात वसईत आगळेवेगळे गाव स्थापन झाले आहे. इथे गवताच्या झोपड्या आहेत. ख्रिस्ती, मुस्लिम, हिंदू समाजांची पारंपरिक घरे आहेत.

A huge response to 'Mahi Vasai' | ‘माही वसई’ला उदंड प्रतिसाद

‘माही वसई’ला उदंड प्रतिसाद

नायगाव : शहरीकरणाच्या वेगात वसईत आगळेवेगळे गाव स्थापन झाले आहे. इथे गवताच्या झोपड्या आहेत. ख्रिस्ती, मुस्लिम, हिंदू समाजांची पारंपरिक घरे आहेत. त्या घरांत पूर्वी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. अंगणात खेळणारी मुले आहेत, तर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिला आहेत. गुरे, बैल, घोडे आहेत. अगदी कोंबड्या व त्यांची खुराडीही आहेत. हे ‘माही वसई’ या संकल्पनेतील संस्कृती दाखवणारे वसईतील एक गाव आहे. शेतीवाडीसह संस्कृतीचा वारसा पुन्हा नव्या पिढीला दाखवण्याचा वसई-विरार शहर मनपाचा हा प्रयत्न आता यशस्वी झाला आहे.
हा सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी वसई परिसरातून मोठा प्रतिसाद लाभत आहे. (वार्ताहर)

Web Title: A huge response to 'Mahi Vasai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.