१८ हजार गाड्यांवर एचएसआरपी नंबरप्लेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 10:41 IST2025-03-04T10:40:06+5:302025-03-04T10:41:03+5:30
एक लाखापेक्षा अधिक गाड्यांना नंबरप्लेट बसविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१८ हजार गाड्यांवर एचएसआरपी नंबरप्लेट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई आणि उपनगरातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) साठी ७२ हजार ४५० अर्ज आले असून, आत्तापर्यंत १८ हजार ४६५ गाड्यांवर ती सुविधा बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या सुविधेसाठी राज्यात लाख ५० ३ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले असून, एक लाखापेक्षा अधिक गाड्यांना नंबरप्लेट बसविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १ कोटी २५ लाख वाहनांवर हाय स्पीड प्लेट बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील आरटीओ कार्यालयांत तीन झोनमध्ये ३ वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार तीन झोनमध्ये अनुक्रमे १२, १६ आणि २७आरटीओ कार्यालयांचा समावेश आहे. गाड्यांवर ३० एप्रिल २०२५ पूर्वी एचएसआरपी बसविणे बंधनकारक असून, ३० एप्रिलनंतर एचएसआरपी नसलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एचएसआरपीची किंमत वाहनाचे प्रकार आणि नंबर प्लेटच्या आकारानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
शुल्क भरण्याची ऑनलाइन सुविधा
नंबरप्लेटसाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्याचे शुल्क जीएसटीसह ऑनलाइनच भरावे लागतात. त्यानंतर फिटमेन्ट सेंटरवर जाऊन निवडलेल्या तारखेला आणि वेळेत त्याची फिटिंग करून घ्यावी लागते.
अशी असते एचएसआरपी
अॅल्युमिनियमपासून बनलेली
जाडी १ मिलीमीटरपेक्षा थोडी अधिक.
क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक
होलोग्राम खाली लेझर बैंडेड १० अंकी पिन कोड असतो