लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. निकालाची टक्केवारी सुधारल्याने मुंबईने गेल्या वर्षीच्या शेवटच्या स्थानावरून राज्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या विभागात यंदाही मुलींनी बाजी मारली. ९४.३३ टक्के मुली, तर ९१.६० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात कोकण मंडळाने निकालात अव्वल स्थान पटकाविले असून, त्यांचा ९६.७४ टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल कोल्हापूर ९३.६४ टक्के आणि मुंबई ९२.९३ टक्के निकाल लागला आहे. गेले दोन वर्षे मुंबईचा निकाल सर्वात शेवटच्या स्थानी होता. मात्र, यंदा यामध्ये चांगलीच सुधारणा झाली असून, मुंबईने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच गेल्यावर्षीच्या ९१.९५ टक्क्यांपेक्षा यंदा निकालात जवळपास एका टक्क्याची वाढ झाली आहे.
गेल्या सहा वर्षांचा निकाल असा...वर्ष टक्केवारी२०२० ८९.३५ २०२१ ९९.७९ २०२२ ९०.९१ २०२३ ८८.१३ २०२४ ९१.९५ २०२५ ९२.९३
मुंबई विभागाचा शाखानिहाय निकाल जिल्हा विज्ञान वाणिज्य कला व्यावसायिक टेक सायन्स एकत्रितठाणे ३८,५९६ ४०,६४६ ९,९६० ४२४ २०१ ९६,०८९रायगड १२,८८७ ९,८९० ४,५९२ ४१८ ६१ २९,४९३पालघर १८,३९२ १९,५१४ ८,४८० २९१ ५२ ५०,८७०मुंबई शहर १०,६५७ १७,५४९ ४,२३८ ३२९ १६३ ३६,४५४प. उपनगर २०,६९१ ३५,०६४ ३,८८७ ५८४ ७१ ६४,८६६पू. उपनगर १२,१८७ १८,८७४ २,५५६ ५८२ ११९ ३७,३४६