Hrithik received 950 pornographic emails in the name of Kangana | हृतिकला कंगनाच्या नावाने आले ९५० अश्लील ईमेल?

हृतिकला कंगनाच्या नावाने आले ९५० अश्लील ईमेल?

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील ईमेल वाद प्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या (सीआययू) चौकशीत कंगनाच्या नावाने असलेल्या दोन ईमेल आयडीवरून हृतिकला ९५० अश्लील ईमेल आले आहेत. यापैकी ३५० ईमेल्स सीआययूने तपासासाठी घेतले आहेत. याच्याच अधिक तपासासाठी हृतिकला समन्स बजावून शुक्रवारी चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे.

हृतिकने आपल्याला आक्षेपार्ह ईमेल धाडल्याच्या आरोपावरून कंगना आणि हृतिकमध्ये वाद सुरू झाले. हृतिकने हे सर्व आरोप फेटाळून कंगनानेच शेकडो मेल पाठविल्याचे सांगितले. पुढे हाच वाद पोलिसांपर्यंत पोहोचला. २०१६ मध्ये या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अनेक वर्षांपासून रखडलेल्या तपासावर लक्ष द्यावे याबाबत हृतिकचे वकील महेश जेठमलानी यांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे विनंती केली होती. 

कंगना राणावत नाव असलेल्या दोन इमेल आयडीवरून ऋतिकला ते मेल आले. या मेलची सीआययुचे पथक अधिक तपास करत आहेत. ऋतिकला समन्स बजावून आणि शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. त्याचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर कंगनालाही समन्स बजावून चौकशीसाठी बोलाविण्यात येईल पुढे सायबर पोलिसांकडून हे प्रकरण डिसेंबरमध्ये सीआययूकडे वर्ग करण्यात आले आहे. सीआययू प्रमुख सचिन वाझे यांच्या नेतृत्वात हा तपास सुरू आहे.

ईमेल्सला हृतिकचा नाही प्रतिसाद
आतापर्यंतच्या तपासात हृतिकला कंगनाच्या नावाने असलेल्या दोन ईमेल आयडीवरून एकूण ९५० अश्लील ईमेल्स आले आहेत. यापैकी ३५० ईमेल सीआययूने तपासासाठी घेतले आहेत. यात अश्लील फोटोंचाही समावेश आहे. यापैकी एकाही ईमेल्सला हृतिकने प्रतिसाद दिला नसल्याचेही तपासात समोर आले आहेत. २०१४ मध्ये एप्रिल ते जूनदरम्यान हे ईमेल्स हृतिकला आले आहेत. हृतिकचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यासाठी समन्स बजावून शुक्रवारी चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जबाबानंतर कंगनालाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सीआययूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik received 950 pornographic emails in the name of Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.