बोटाला शाई लागल्यावर पुन्हा मतदान कसे करायचे?
By Admin | Updated: October 16, 2014 00:27 IST2014-10-16T00:27:50+5:302014-10-16T00:27:50+5:30
विधानसभा निवडणुकांच्या काळात सर्वच प्रमुख पक्षाच्या युत्या, आघाड्या तुटल्याने सर्वच इच्छुक उमेदवार या ना त्या कारणाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते.

बोटाला शाई लागल्यावर पुन्हा मतदान कसे करायचे?
संजय कांबळे, वरपगाव
विधानसभा निवडणुकांच्या काळात सर्वच प्रमुख पक्षाच्या युत्या, आघाड्या तुटल्याने सर्वच इच्छुक उमेदवार या ना त्या कारणाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. याच लगीन घाईत तालुक्यातील दहागाव या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्याने एकदा विधानसभेसाठी मतदान केल्यानंतर परत ग्रामपंचायतीकरिता कसे मतदार करायचे शिवाय बोटाला लावलेल्या शाईचे काय? असा मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
शनिवार २७ सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, शनिवारी ४ आॅक्टोबर अर्ज सादर करणे मंगळवार ७ आॅक्टोबर छाननी, ९ला अर्ज मागे घणे आणि शनिवार १८ आॅक्टोबरला मतदान म्हणजे विधानसभेच्या वेळी मतदान करतेवेळी बोटाला लावलेली शाई तीन दिवसात कशी पुसायची? असा प्रश्न दहागाव ग्रामस्थांना पडला आहे.
आॅक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत मुदत संपलेला तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र्य गा्रमपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दहागाव या ग्रामपंचायतीचा समावेश असून ७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती.दहागावमध्ये अनुसूचित जाती ७, अनुसूचित जमाती १४६ इतर ७८९ अशी एकूण ९४२ लोकसंख्या आहे. त्यामुळे आमदारांनासाठी प्रचार करायचा की स्वत:च्या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालायचे अशा द्विधा मनस्थितीत मतदार सापडले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या लगीनघाईच्या वरातीमागून ग्रामपंचायतीचे घोडे असे ग्रामस्थ म्हणत आहेत.