स्टेट बॅँकेचे क्रेडिट कार्ड बंद कसे करायचे ?
By Admin | Updated: December 21, 2014 23:24 IST2014-12-21T23:24:08+5:302014-12-21T23:24:08+5:30
स्टेट बॅँकेच्या जव्हार येथील शाखेतून दोन ते तीन वर्षापूर्वी बॅँकेच्या ग्राहकांना मुदत ठेवीवर क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली होती

स्टेट बॅँकेचे क्रेडिट कार्ड बंद कसे करायचे ?
हुसेन मेमन, जव्हार
स्टेट बॅँकेच्या जव्हार येथील शाखेतून दोन ते तीन वर्षापूर्वी बॅँकेच्या ग्राहकांना मुदत ठेवीवर क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली होती, परंतु, क्रेडिट कार्ड ही मोठी दगदग आहे. कधीही कुठलेही अतिरीक्त चार्ज लावले जातात. याची जाणीव होताच ग्राहकांनी के्रडिट कार्ड बंद करण्यासाठी बॅँकेत धाव घेतली, परंतु, बॅँकेच्या व्यवस्थापकांनी आमच्या कडे क्रेडिट कार्ड बंद करण्याची सुविधा उपलब्ध नाही, तुम्हाला टोल फ्रि नंबरवर संपर्क करावा लागेल असे उत्तर देऊन परत पाठविले आहे.
भारतीय स्टेट बॅँक आॅफ इंडिया शाखा जव्हार येथील काही ग्राहकांनी क्रेडिट कार्ड सुरू करून घ्यावे यासाठी एक दोन वर्षापूर्वी बॅँकेच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या मागे तगदा लावला होता, कारण के्रडिट कार्ड सुविधा सुरू करण्याकरीता बॅँकेकडे बचत ठेव करून घ्यावी लागते, याचाच फायदा घेत बॅँकेने के्रडिटकार्ड विभागातून हेमंत नावाच्या कर्मचाऱ्याला बोलावून बॅँकेत अर्ज उपलब्ध करून दिले, मोठ मोठ्या प्रमाणात ठेवी करून बॅँकेचा फायदा करून घेतला, परंतु, कारण नसतांना अतिरीक्त शुल्क व आकार कार्डाच्या बिलात नमूद होत होती, अव्वाच्या सव्वा व्याज दर अशा अनेक कारणांमुळे ग्राहकांची स्टेट बॅँकेच्या के्रडिटकार्ड विभागाकडून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.
आता हे नकोसे झालेले महागडे कार्ड कसे बंद करावयाचे असा प्रश्न स्टेट बॅँक शाखा जव्हारचे व्यवस्थापक अजिंक्य पट्टेबहाद्दर यांना केला असता, त्यांनी आम्हाला क्रेडिटकार्डाचे काहीच माहित नाही, तुम्हाला कार्ड बंद करावयाचे असेल तर तुम्ही टोल फ्री नंबरवर संपर्क करा असे उत्तर दिले. आय.टी. क्षेत्राच्या जमान्यात कार्ड सुविधा बंद करण्यासाठी विनंती अर्ज करावा लागतो हे अश्चर्य वाटते, आणि एकाच विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांना क्रेडिटकार्ड बंद करण्याची सुविधा शाखेत उपलब्ध नाही असे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे आम्ही याची तक्रार थेट स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेत करणार आहोत, असे चाबुकस्वार या ग्राहकाने सांगितले.