Join us  

राज्यातील धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 8:15 AM

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा विषय चर्चेत येतो.

ऋषिराज तायडे

लोकमत न्यूज नेटवर्क- उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा विषय चर्चेत येतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा फारसा तीव्र नसला आणि अवकाळी पावसाने राज्यभरात दाणादाण उडवली असली तरी राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा बराच कमी झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणाने तळ गाठला आहे. विविध उपसा सिंचन योजनेतून पाणीउपसा सुरू असल्याने गेल्या ५५ दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणी संपले. गतवर्षी १२ जूनला उणेमध्ये गेलेले उजनी धरण यंदा ६ मे रोजी म्हणजे ३७ दिवस आधीच उणेपातळीत गेले आहे.

महापालिकांच्या भाडेपट्ट्यात कपात; शिंदे सरकारचा दिलासा; नूतनीकरणावेळी मूळ भाडेपट्टाधारकास प्राधान्य

उजनी धरणाची क्षमता १२० टीएमसी असून, सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे जलसाठा उणेमध्ये गेल्यानंतर ६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. त्यापैकी ४० ते ४४ टीएमसीच पाणी प्रत्यक्ष वापरण्यास मिळते.

राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार सध्या राज्यातील २३५ गावांमध्ये एकूण १८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने कोकण विभागात १००, नाशिक ३७, पुणे २६, छत्रपती संभाजीनगर पाच आणि अमरावती विभागात १६ टँकर उपलब्ध केले आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील एकूण धरणांमध्ये सरासरी सर्वाधिक ४६.७८ टक्के, तर पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वांत कमी जलसाठा उपलब्ध आहे.

प्रमुख धरणांमधील जलसाठा

धरण   सध्याचा        गतवर्षीचा

(टक्क्यांमध्ये)   जलसाठा आजचा जलसाठा

अप्पर वर्धा      ४७.१०   ५०.५३

बेंबळा   ४०.१७   ५३.७१

जायकवाडी      ४४.०१   ४७.६५

मांजरा  ४३.०५   ५५.१४

मध्य वैतरणा    १४.७६   ४२.२०

तानसा  ४४.१६   ३१.६१

गोसेखुर्द २८.९३   २४.५५

बोर     ३९.१४   ४५.०८

भंडारदरा ५७.५९   ४४.१५

राधानगरी       ३१.४०   ४३.२१

खडकवासला     ५७.०४   ३९.३०

कोयना  २८.३५   २९.२५

उजनी   ०.००    १९.०१

(आकडेवारी ९ मे रोजीची ।

स्रोत : जलसंपदा विभागाचे संकेतस्थळ)

टॅग्स :पाणी