Join us

तुम्ही घेताय त्या उसाच्या रसात साखर किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 08:10 IST

एप्रिल महिना उजाडला आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. जवळपास सर्वत्रच पारा चांगलाच वर चढू लागला आहे.

एप्रिल महिना उजाडला आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. जवळपास सर्वत्रच पारा चांगलाच वर चढू लागला आहे. बाहेर पडल्यास सतत घशाला कोरड पडत राहते, सतत पाणी प्यावेसे वाटते. थंड पाणी पिण्याचा कल वाढला आहे. साहजिकच उसाच्या रसाच्या दुकांनावर गर्दी वाढू लागली आहे; पण उन्हाळ्याच्या दिवसात मधुमेहींनी उसाचा रस प्यावा का? त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते का?

 एक कप रसात किती साखर? (२४० मिली कप) कॅलरी    १८३ युनिट प्रोटीन     ० ग्रॅम फॅट     ० ग्रॅम साखर     ५० ग्रॅम फायबर     ०-१३ ग्रॅम 

शरीराला काय फायदे होतात? - उसाचा रस गोड आणि अत्यंत चवदार असतो. भारतच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात उसाचा रस सर्वदूर चांगलाच लोकप्रिय आहे. - काही देशांमध्ये उसाच्या रसाचा वापर मूत्रपिंड, यकृताचे आजार तसेच अन्य रोग बरे करण्यासाठी केला जातो. - हा रस म्हणजे फेनॉलिक आणि फ्लेववॉइट अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असतो. ही शरीरासाठी लाभदायक असतात. - यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने रस प्यायल्याने शरीर उत्तम प्रकारे रिहायड्रेट होते. यात लाभदायक पोटॅशियमही असते. 

साखरेचे प्रमाण चिंताजनकएक कपात ५० ग्रॅम म्हणजेच १२ चमचे इतकी साखर असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते पुरुषाला दर दिवशी जास्तीत जास्त ९ चमचे तर महिलांना ६ चमचे इतकी साखर खाणे हितकारक आहे. यापेक्षा अधिक साखर खाणे टाळले पाहिजे.उसाच्या रसाचा ग्लायेमिक इंडेक्स कमी असला, तरी ग्लायसेमिक लोड अधिक असतो. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. यात चांगली पोषक तत्त्वे असली, तरी उसाचा रस प्यायल्याने रक्तातील साखर वाढण्याची भीती असते. (ही माहिती तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे.)

उसात नेमके काय? १३ ते १५% साखर१० ते १५% फायबर्स७० ते ७५% पाणी