नारायण जाधव -नवी मुंबई : महामुंबईत दररोज कोट्यवधी लिटर इंधनाची गरज भागवण्यासाठी हजारो टँकर शहरात दाखल होत असतात. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि विमान इंधनाचा पुरवठा मुख्यत्वे मुंबईतील तेल डेपो आणि रिफायनरी परिसरातून केला जातो. ऊर्जा क्षेत्रातील अंदाजानुसार, महामुंबईच्या गरजा भागवण्यासाठी दररोज सुमारे २००० ते २५०० इंधन टँकर विविध डेपोंमधून शहर व उपनगरांतील १२०० पेक्षा जास्त पेट्रोल पंप आणि ३५० हून अधिक सीएनजी स्टेशनवर पाठवले जाते, अशी माहिती या क्षेत्रातील सूत्रांनी दिली. आखाती युद्धामुळे देशभरात निर्माण झालेल्या गॅससह इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महामुंबईतील महानगरांतील शहरांना दररोज किती इंधन, घरगुती गॅस व रस्ते बांधकामासाठी डांबर लागते, याची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेतली.
महामुंबईतील प्रमुख तेल डेपो व टर्मिनल्सवडाळा ऑइल टर्मिनल - हे देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम स्टोरेज टर्मिनलपैकी एक असून पेट्रोल, डिझेल, एटीएफ साठवण व मुंबई व उपनगरांसाठी प्रमुख वितरण केंद्र आहे.माहुल टर्मिनल - मोठे पेट्रोलियम व केमिकल स्टोरेज हब असून पाइपलाइनद्वारे रिफायनरीशी जोडलेलेबीपीसीएल मुंबई रिफायनरी - भारतातील महत्त्वाची रिफायनरी असून रोज लाखो लिटर पेट्रोल-डिझेल उत्पादन होते.एचपीसीएल मुंबई रिफायनरी - मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल, एटीएफ उत्पादन होते. येथून पश्चिम भारतासाठी पुरवठा होतो.जेएनपीटी लिक्विड कार्गो टर्मिनल- आयात होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांसाठी प्रमुख बंदर टर्मिनलमुंबई बंदर तेल टर्मिनल - क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम उत्पादने उतरवण्याचे केंद्रट्रॉम्बे ऑइल टर्मिनल - पाइपलाइन व टँकरद्वारे वितरणउरण एलपीजी टर्मिनल - येथूनच मोठ्या प्रमाणावर एलपीजीची साठवण व वितरण होते.पनवेल पेट्रोलियम डेपो- येथून नवी मुंबई व रायगडसाठी वितरण होते.भिवंडी पेट्रोलियम स्टोरेज हब - भिवंडी परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या लॉजिस्टिक्स हबसाठी डिझेल-पेट्रोल वितरण होते.
Web Summary : Mumbai requires thousands of fuel tankers daily to meet its energy demands. Approximately 2000-2500 tankers supply petrol, diesel, and CNG to over 1200 petrol pumps and 350 CNG stations from major oil depots and refineries, ensuring a steady fuel supply.
Web Summary : मुंबई को अपनी ऊर्जा जरूरतों को पूरा करने के लिए प्रतिदिन हजारों ईंधन टैंकरों की आवश्यकता होती है। लगभग 2000-2500 टैंकर प्रमुख तेल डिपो और रिफाइनरियों से 1200 से अधिक पेट्रोल पंपों और 350 सीएनजी स्टेशनों तक पेट्रोल, डीजल और सीएनजी की आपूर्ति करते हैं, जिससे ईंधन की स्थिर आपूर्ति सुनिश्चित होती है।