‘किती पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही लावले ?’
By Admin | Updated: September 21, 2014 02:37 IST2014-09-21T02:37:01+5:302014-09-21T02:37:01+5:30
आतार्पयत किती पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले याची माहिती सादर करण्याचे आदेश न्या़ व्ही़एम़ कानडे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत़

‘किती पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही लावले ?’
मुंबई : गेल्या महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आतार्पयत किती पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले याची माहिती सादर करण्याचे आदेश न्या़ व्ही़एम़ कानडे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत़
काही दिवसांपूर्वी वडाळा रेल्वे पोलिसांच्या कोठडीत एका मुलाचा मृत्यू झाला़ मात्र पोलिसांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली़ अशा प्रकारे विविध ठिकाणच्या दोन ते तीन याचिका न्यायालयात दाखल झाल्या़ त्याची दखल घेत न्यायालयाने या सर्व याचिका ंएकत्रितपणो सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या़ त्यात अॅमक्यस क्युरी युग चौधरी यांनी कोठडीतील मृत्यूप्रकरणाची आकडेवारी सादर केली़ त्यावर न्यायालयाने गेल्या महिन्यात सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले. यासाठी अजून चार आठवडय़ांची मुदत द्यावी, अशी विनंती शासनाने केली़ ती फेटाळून न्यायालयाने हे आदेश देत सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)