भिवंडीत मतदारयाद्यांचा घोळ कसा मिटवणार?
By Admin | Updated: April 25, 2017 02:01 IST2017-04-25T02:01:53+5:302017-04-25T02:01:53+5:30
भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक एका महिन्यावर येऊन ठेपली असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग मतदार याद्यांच्या घोळाबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे.

भिवंडीत मतदारयाद्यांचा घोळ कसा मिटवणार?
मुंबई : भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक एका महिन्यावर येऊन ठेपली असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग मतदार याद्यांच्या घोळाबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. आता ऐनवेळी मतदार याद्यांचा घोळ मिटवणार कोण, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मतदार याद्यांच्या घोळाला जबाबदार कोण, असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला केला होता. त्यावर राज्य आयोगाने ही जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील उपस्थित राहिले होते. (प्रतिनिधी)