मुख्यमंत्र्यांना चौथी पास ड्रायव्हर कसा चालतो ?

By Admin | Updated: August 26, 2014 00:25 IST2014-08-26T00:24:38+5:302014-08-26T00:25:23+5:30

रिक्षा संघटनांचा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सवाल

How does the Chief Minister run the fourth pass driver? | मुख्यमंत्र्यांना चौथी पास ड्रायव्हर कसा चालतो ?

मुख्यमंत्र्यांना चौथी पास ड्रायव्हर कसा चालतो ?

कोल्हापूर : रिक्षा परमीट देताना आठवी पासची अट शासनाने लावली आहे. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर चौथी पास चालक कसा चालतो, असा सवाल करत परमीटसाठीची आठवी पासची अट रद्द करावी. यासह अन्य मागण्यांसाठी आज, सोमवारी (दि. २५) शहरातील सर्व रिक्षाचालक मालक संघटनांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांना निवेदन दिले.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर चौथी पास चालक चालतो. मग आठवी नापास रिक्षाचालकांना परमीट का दिले जात नाही तसेच रंकाळा-कागल, रंकाळा-हुपरी ही एस.टी.ची बससेवा क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करते.
या बसवर देखील रिक्षाचालकांप्रमाणे कारवाई करावी. आयआरबीने रस्ते करताना रिक्षा स्टॉपची जागा काढून घेतली. ती जागा परत फायनल करून द्यावी.
चुकीच्या पद्धतीने आॅनलाईन अर्ज भरल्याने ८० परमीटचा निर्णय रखडला आहे. त्या रिक्षाचालकांबाबत त्वरित निर्णय घ्यावा. यासह अन्य मागण्या यावेळी निवेदनाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.
याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी आपल्या भावना वरिष्ठ कार्यालयाकडे पोहोचवू, अशी ग्वाही उपस्थित रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींना दिली.
यावेळी करवीर आॅटो रिक्षा, युनियन, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना, शेअर-ए-रिक्षा संघटना, कॉमनमॅन रिक्षा संघटना, कोल्हापूर रिक्षा व्यवसाय संघटना, हिंदुस्थान आॅटो युनियन, कोल्हापूर शहर चालक-मालक संघटना, शिवशक्ती आॅटो रिक्षा संघटना, आदर्श आॅटो रिक्षा युनियन, कोल्हापूर रिक्षा सेना वाहनधारक महासंघ, शाहू रिक्षा मित्रमंडळ, न्यू करवीर आॅटो रिक्षा युनियन आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: How does the Chief Minister run the fourth pass driver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.