सेवानिवृत्त पोलीस वसाहतीमध्ये राहतात कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:05 AM2018-02-24T05:05:25+5:302018-02-24T05:05:25+5:30

सेवानिवृत्तीनंतरही पोलीस वसाहत सोडायला टाळाटाळ करणाºयांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

How do the retired police live in colonies? | सेवानिवृत्त पोलीस वसाहतीमध्ये राहतात कसे?

सेवानिवृत्त पोलीस वसाहतीमध्ये राहतात कसे?

Next

मुंबई : सेवानिवृत्तीनंतरही पोलीस वसाहत सोडायला टाळाटाळ करणाºयांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व पोलीस आयुक्तांना चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले.
कर्तव्यावर असलेले २५०० पोलीस घरांच्या प्रतीक्षेत असताना सेवानिवृत्त झालेले १,८५० जण पोलीस वसाहतीमधील घर सोडायला टाळाटाळ करत आहेत. राज्य गृह विभागाला ही घरे खाली करून घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती वरळी येथील शस्त्रास्त्र विभागात
काम करणाºया सुनील टोके यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाला केली आहे.
टोके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी होती. उच्च न्यायालयाने
दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर राज्य सरकार व पोलीस आयुक्तांना चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

Web Title: How do the retired police live in colonies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.