रिक्षाचालकांच्या मनमानीला शह द्यायचा तरी कसा?
By Admin | Updated: September 16, 2014 23:38 IST2014-09-16T23:38:22+5:302014-09-16T23:38:22+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांमधील नागरिक सातत्याने रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे जेरीस आले आहेत.

रिक्षाचालकांच्या मनमानीला शह द्यायचा तरी कसा?
अनिकेत घमंडी - डोंबिवली
कल्याण-डोंबिवली शहरांमधील नागरिक सातत्याने रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे जेरीस आले आहेत. दळणवळणाची चांगली सुविधा देण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असल्यानेच इच्छा नसतानाही रिक्षाचा पर्याय नागरिकांना स्वीकारावा लागत आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा कुचकामी ठरत आहे. दिवसाला अपेक्षित असणा:या फे:यांची पूर्तता न होणो, कर्मचा:यांचे वेतन, कुशल कामगार, चांगल्या बससह सुस्थितीतील आगारांची वानवा आदी सर्व बाबी कारणीभूत आहेत. याकडे कोणीही नागरिक अथवा सत्ताधारी लक्ष घालत नाहीत. परिणामी, परिवहनाचे मुख्य साधन रिक्षा की परिवहन सेवा, असा मुख्य प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका परिवहनचे सदस्य राजेश कदम यांनी केली. परिणामी, दिवसाला दीड-दोन लाखांची घट होत असल्याचेही त्यांनी लोकमतच्या निदर्शनास आणले.
ही तूट का होत आहे तसेच ती भरून काढण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांवर भर देण्यात येत नाही. दिवसाला परिवहनच्या माध्यमातून पाच/साडेपाच लाखांची उलाढाल होते, ती आठ/साडेआठ लाख होणो अत्यावश्यक आहे. गेल्या 14 वर्षात प्रत्येक वर्षी साधारणत: 1क् टककयांची वृद्धी होऊन बसची संख्या वाढणो अपेक्षित होते. आजमितीस परिवहनकडे 125 बस आहेत. त्यापैकी 15-2क् विविध तांत्रिक कामांमुळे बंद आहेत. 1क्-15 अत्यावश्यक सेवांसाठी ठेवण्यात येतात. उरलेल्या 9क् बस दिवसाला रस्त्यावर उतरणो अपेक्षित असते. मात्र, अनेकदा तसे होत नाही. बहुतांशी वेळेला गणोश आगारातून त्या बाहेर पडल्या की, ब्रेकडाऊनसह अन्य तांत्रिक कारणामुळे त्यातील काही बंद पडतात. त्या फे:या होऊ शकत नाहीत. त्यामुळे सकाळच्या सत्रत केवळ 75 बसेस धावतात. दिवस चढत जाईल, तसतशी ही संख्या रोडावत जाते. त्यामुळे संध्याकाळ-रात्री आढावा घेतल्यास सकाळच्या संख्येत कमी-अधिक प्रमाणात बसेसच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये कर्मचारीही रजेवर असण्याचे कारण असतेच.
परिवहनचे सुमारे 34 रूट (मार्ग) आहेत. डोंबिवली परिसरात सुमारे 9/1क् मार्गाचा समावेश असून अन्य कल्याण परिसरात टिटवाळा-मोहनेर्पयत बसेस धावतात. मात्र, सर्वेक्षणानुसार दिवसाला सर्वच ठिकाणी बस धावत नाहीत. साधारणपणो 28/29 मार्गावरच बस धावते. ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत, तेथून मिळणारा अल्प प्रतिसाद, रस्त्यांची दुरवस्था आणि कर्मचा:यांची मानसिकता आदी कारणो समोर येत आहेत. डोंबिवलीतील निवासी भागात (स्टेशन ते एमआयडीसी) जाण्यासाठी दर 15 मिनिटांनी फे:या होतात. त्यामुळे या मार्गावर नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड असून मागणी तसा पुरवठा ही वेळच येथे येत नाही. बहुतांशी नागरिक यावर समाधानी आहेत. मात्र, पश्चिमेकडील भागात रेतीबंदर रोड, चिंचोडय़ाचा पाडा, पाण्याची टाकी आदी ठिकाणी अनेकदा त्या जातच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशीच स्थिती भोपर, हेदुटणो आदी ठिकाणची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिंग रूटची सुविधा नावालाच आहे का, असा सवालही त्यांनी केला.
या सर्वाचा परिणाम परिवहनच्या सुमारे 7क्क् कर्मचा:यांच्या वेतनावरही होतो. येथील कामगारांना जे वेतन 1-1क् तारखेर्पयत देणो अपेक्षित असते, ते 2क्/25 तारखांना दिले जात असल्याचे कदम म्हणाले. त्यामुळे कर्मचा:यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून अनेकांनी विविध कारणांसाठी कर्ज घेतलेली असतात. त्यामुळे त्यांचे हप्ते थकतात. यासह विविध अडचणी असून कर्मचारी नाराज असतात.
4कुशल कामगारांची वानवा असल्याने बसेसचे कोणतेही विशेष काम करायचे झाल्यास बाहेरून कामगार आणावे लागतात. त्यासह स्पेअर पार्ट्सची कमतरता आदींमुळे कोटय़वधींची देणी आहेत. अशा अडचणींमुळे सहावा वेतन आयोग नाही, कोणतेही भत्ते कर्मचा:यांना देता येत नाहीत.
डोंबिवली पनवेल/वाशी फे:यांचीही तीच त:हा :
पनवेल-वाशीला जाण्यासाठी नव्या गाडय़ा आल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान होते. मात्र, तेथेही वेळेवर बससेवा जात नाहीत फ्रिक्वेन्सीचा प्रश्न असल्याने सकाळनंतर दुपारी-संध्याकाळी फारसे प्रवासी मिळत नाहीत. वाशी मार्गावर तर अनेकदा दुपारनंतर फेरीच होत नसल्याच्या तक्रारी येत असून त्यात तथ्य आहे.
4परिवहनचे कल्याणमध्ये गणोशघाट परिसर आणि डोंबिवलीत खंबाळपाडा असे दोन आगार आहेत. मात्र, त्यापैकी खंबाळपाडय़ाच्या आगारात कच:याच्या गाडय़ा पार्क केल्या जातात. त्यामुळे जागा व्यापली जाते. परिणामी, आरोग्यासह अन्य कारणांमुळे त्या ठिकाणी गाडय़ा ठेवता येत नाहीत. अशातच डोंबिवलीसाठी येणारी गाडी सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा सत्रंमध्ये केवळ जा-ये करण्यासाठी अनेकदा रिकामी धावते. परिणामी, परिवहनचे इंधन, वेळ वाया जातो. त्या गाडय़ा येथूनच सुटल्या तर दिवसाच्या एकूण फे:यांमध्ये वाढ होईल. साहजिकच उत्पन्नातही वाढ होईल, पण केवळ हेकेखोर धोरणामुळे ते होऊ शकत नाही.
परिवहनच्या दिवसाच्या उद्दिष्टामध्ये लाख-दीड लाखाची उलाढाल कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांनीही जास्तीतजास्त परिवहन सुविधेचा लाभ घ्यावा, जेणोकरून उत्पन्न वाढेल. साहजिकच, कर्मचा:यांसह अन्य समस्या सुटतील. आगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रय} सुरु असून महिनाभरात त्यावर तोडगा निघेल. आगामी काळात जनजागृतीवर भर देण्यात येईल. प्रशासनाचीही साथ योग्य रीतीने मिळत आहे.
- रवी कपोते, सभापती, परिवहन कल्याण-डोंबिवली