Join us  

कसा साजरा करणार विद्यार्थी दिवस? शाळांपुढे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 6:39 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा शासन निर्णय ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला. मात्र या काळात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी दिवस कसा साजरा करणार, असा प्रश्न शाळांपुढे आहे.

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा शासन निर्णय ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला. मात्र या काळात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी दिवस कसा साजरा करणार, असा प्रश्न शाळांपुढे आहे.सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करणे किंवा शिक्षणाची आवड निर्माण करणे असे पर्याय दिले आहेत. मात्र, सुट्टीमुळे विद्यार्थी दिनाचा मूळ हेतू खरेच साध्य होणार आहे का? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहे.शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशानेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील सर्व शाळांना या दरम्यान सुट्टी असल्याने, शाळांमध्ये विद्यार्थी दिवस साजरा होण्याचा पर्यायच उपलब्ध राहत नाही. विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध, वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन व्हावे. मात्र, सुट्ट्यांच्या काळात त्याचे नियोजन शाळांना शक्य नाही, असे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे उदय नरे यांनी सांगितले. तूर्तास दलित वस्त्या, झोपडपट्ट्यांत पुस्तक वाटप, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन, असे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत.

टॅग्स :शाळाशिक्षण क्षेत्र