दिवाळीच्या सुटीत कसा साजरा करणार ‘राष्ट्रीय एकता दिन’? , सरदार वल्लभभाई पटेल जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:03 IST2017-10-28T06:03:44+5:302017-10-28T06:03:57+5:30
मुंबई : शाळांना दिवाळीची सुट्टी सुरू आहे. यंदा शाळेची सुट्टी कमी केली असली, तरी अनेक शाळा या २ किंवा ३ नाव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

दिवाळीच्या सुटीत कसा साजरा करणार ‘राष्ट्रीय एकता दिन’? , सरदार वल्लभभाई पटेल जयंती
मुंबई : शाळांना दिवाळीची सुट्टी सुरू आहे. यंदा शाळेची सुट्टी कमी केली असली, तरी अनेक शाळा या २ किंवा ३ नाव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यातच शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती शाळांमध्ये ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा बंद असल्यामुळे आता नक्की काय करायचे, या संभ्रमात शिक्षक आहेत.
शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात ३१ आॅक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असल्यामुळे, त्यांच्या स्मरणार्थ ‘राष्ट्रीय एकता दिन’ देशभरात साजरा केला जाणार आहे. सरदार पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, तसेच स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय एकसंधीकरणात मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना याविषयी माहिती असावी, त्यांचे ज्ञान वाढावे, म्हणून हा दिन साजरा करावा, असे परिपत्रक काढले आहे.
या दिवशी शाळांमध्ये ‘सध्याच्या भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांचे महत्त्व’ या विषयावर वक्तृत्व, निबंध स्पर्धा आयोजित करणे, सरदार पटेल यांच्या चरित्रावर आधारित संगीत, नाटक आणि एकांकिका स्पर्धांचे आयोजन करणे, ‘एकता’ या संकल्पनेवर घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करणे, असे सांगण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना अजून एक माहिती गोळा करण्यास सांगितली आहे.
टीचर डेमोक्रेटिक फ्रंटचे राजेश पंड्या यांनी सांगितले की, सध्या शाळांना दिवाळीची सुट्टी सुरू आहे. सर्व शाळा या वेगवेगळ््या दिवशी पुन्हा सुरू होणार आहेत. दिवाळी आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात येते. त्यामुळे प्रत्येक वर्षी या दिवशी शाळांना सामान्यपणे सुट्टी असते, तसेच १४ नाव्हेंबर हा ‘बालदिन’ म्हणून साजरा करता येतो, पण नोव्हेंबरमध्ये दिवाळी आल्यास हा दिन साजरा करता येत नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील भागात राहणाºया स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सांगितले आहे, पण सरकारने सैनिकांविषयीची माहितीच उपलब्ध करून दिलेली नसल्याने, विद्यार्थी त्यांचा शोध घेणार कसा? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.