Join us  

कोर्टाचा आदेश नसतानाही फेरीवाले रस्त्यावर बसतातच कसे?, राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 3:02 PM

रेल्वेच्या स्टेशनपासून 150 मीटरच्या अंतरावर कुठेही फेरीवाले बसू नयेत, असा आदेश न्यायालयानं दिला आहे.

मुंबई- राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. कोर्टाच्या आदेश नसतानाही फेरीवाले रस्त्यावर बसतातच कसे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. रेल्वेच्या स्टेशनपासून 150 मीटरच्या अंतरावर कुठेही फेरीवाले बसू नयेत, असा आदेश न्यायालयानं दिला आहे. तरीही फेरीवाले रस्त्यावर बसतातच कसे, मागे मनसेचं आंदोलन झालं तेव्हा सर्वकाही सुरळीत झालं होतं. परंतु आता ते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत.महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर हे निकम्मे किंवा पैसे खाऊ आहेत. या सगळ्या फेरीवाल्यांकडून हे अधिकारी पैसे आणि हफ्ते खातात आणि त्यांना तिथे बसालय देतात. हे मुजोर अधिकारी हायकोर्टाचे आदेशही झुगारून लावायला लागतेत. जर न्यायालयाचा आदेश मानायचाच नसेल, तर मग हवीत कशाला ती न्यायालयं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. अधिकाऱ्यांना 150 मीटरच्या अंतरात बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी. मनसेने आंदोलन केल्यानंतर रेल्वेच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले होते. आता पालिका अधिकारी पैसे घेऊन फेरीवाल्यांना बसवत आहेत. या फेरीवाल्यांना हटविले नाही, तर आंदोलन करू असे पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी सांगितले आहे. दरम्यान यावेळी फेरीवाल्यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलन केलं आहे. एका फेरीवाल्यानं महापालिकेच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुरक्षारक्षकांनी वेळीच रोखल्यानं त्याचा जीव बचावला आहे. फेरीवाल्यांनीही आज आंदोलन केलं आहे. हिंगवाला मार्केटमधील 317 फेरीवाल्यांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलन करणाऱ्या सर्व फेरीवाल्यांना ताब्यात घेत पोलीस आझाद मैदानात घेऊन जातात. घाटकोपर येथील हिंगवाला मार्केटमधील फेरीवाल्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. संबंधित मार्केट गेल्या 18 महिन्यांपासून बंद असल्याने फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पुनर्वसन करण्याची मागणी करत फेरीवाल्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीचा धंदा थाटला आहे.

टॅग्स :राज ठाकरेफेरीवाले