मुंबईत लाखोंच्या ड्रग्जची विक्री करणारी गृहिणी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:45+5:302020-12-04T04:18:45+5:30
कुटुंबही गुंतलेय ड्रग्ज तस्करीत मुंबईत लाखोंच्या ड्रग्जची विक्री करणारी गृहिणी जाळ्यात कुटुंबही गुंतलेय ड्रग्ज तस्करीत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

मुंबईत लाखोंच्या ड्रग्जची विक्री करणारी गृहिणी जाळ्यात
कुटुंबही गुंतलेय ड्रग्ज तस्करीत
मुंबईत लाखोंच्या ड्रग्जची विक्री करणारी गृहिणी जाळ्यात
कुटुंबही गुंतलेय ड्रग्ज तस्करीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ची विक्री करणाऱ्या शबीना सर्फराज खान (२६) या विवाहितेला अटक करण्यात आली आहे. शबीना ही मुंबईतले बडे विक्रते, वितरकांपैकी एक असून मुंबईत महिन्याला लाखो रुपये किमतीच्या ड्रग्जची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिच्याकडून एक डायरीही पोलिसांनी जप्त केली असून, अधिक तपास सुरू आहे.
शबीना हिचा पती अभिलेखावरील आरोपी असून, त्याला तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यानंतर शबीनाने यावर जम बसवला. मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री सुरू केली आहे.
याच दरम्यान ती कुर्ला परिसरात अर्धा किलो एमडीसह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांच्या पथकाने तिला अटक केली. तिच्याकडून ५० लाख किमतीचा एमडीचा साठाही जप्त करण्यात आला आहे. तिच्या घरातून पथकाने एक डायरी जप्त केली आहे. या डायरीतून महत्त्वपूर्ण माहिती पथकाच्या हाती लागली आहे. त्यानुसार तिच्याकडे अधिक तपास सुरू आहे.