Join us

घरकामाच्या बहाण्याने मारायची डल्ला!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 07:18 IST

घरकाम करण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू घरांत प्रवेश मिळवायचा. त्यानंतर, संधी साधून त्याच घरात डल्ला मारून पळ काढायचा, या कार्यपद्धतीचा वापर करत, मुंबईभर चोºया करत फिरणाºया चोरट्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात मंगळवारी दिंडोशी पोलिसांना यश आले.

मुंबई : घरकाम करण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू घरांत प्रवेश मिळवायचा. त्यानंतर, संधी साधून त्याच घरात डल्ला मारून पळ काढायचा, या कार्यपद्धतीचा वापर करत, मुंबईभर चोºया करत फिरणाºया चोरट्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात मंगळवारी दिंडोशी पोलिसांना यश आले.नर्मदा शोएब खान उर्फ भारती (३३) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती ठाण्यातील शिवाजीनगरमध्ये राहते. गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात राहणाºया व्यक्तीच्या घरातून २२ लाख ८५ हजार रुपये किमतीचे दागिने आणि ३२ हजारांची रोकड गायब झाली, ज्याची तक्रार त्यांनी २५ जानेवारीला दिंडोशी पोलीस ठाण्यात दाखल केली. चौकशीच्या दरम्यान २३ जानेवारीला भारती नावाची महिला त्यांच्याकडे घरकाम करण्यासाठी आली. मात्र, त्यानंतर ती आलीच नाही. मुख्य म्हणजे कमी पगारात काम करण्याचे तिने कबूल केल्याने, तिचा फोटो, पत्ता किंवा अन्य कोणतीही ओळख पटेल असे कागदपत्र त्यांनी भारतीकडून घेतले नाही. त्यामुळे तिच्याबद्दल काहीच ‘क्लू’ पोलिसांकडे नव्हता.अखेर भारती हिच या चोरीमागे असल्याचे उघड झाल्यानंतर, तिच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आल्याचे राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तिने या गुन्ह्याची कबुली दिली असून, तिला न्यायालयात हजर करण्यात आले.घरकामाला ठेवताना.... कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरकामाला ठेवताना त्याचा फोटो, पत्ता, ओळखपत्र घ्या, तसेच याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यालाही माहिती द्या. कारण स्वस्तात नोकर मिळविण्याच्या प्रयत्नात लाखोंचे नुकसान तर होतेच. मात्र, कधीतरी ही बाब जिवावरही बेतू शकते, अशी विनंती राठोड यांनी मुंबईकरांना केली आहे.

टॅग्स :गुन्हा