तारापूरात घर कोसळले
By Admin | Updated: September 11, 2014 00:23 IST2014-09-11T00:23:54+5:302014-09-11T00:23:54+5:30
तारापूर गावातील गवंडी मोहल्ल्यातील घर अचानक कोसळले.

तारापूरात घर कोसळले
बोईसर : तारापूर गावातील गवंडी मोहल्ल्यातील घर अचानक कोसळले. परंतु, सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी त्या घरात राहणारी तीन कुटुंबे मात्र बेघर झाली आहेत.
नसिमुल गनी कासीम शेख, इतेखाब शेख व हसन शेख या तीन भावांचे राहते घर कोसळलेअसून घराच्या मागील बाजूची भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच तिन्ही कुटुंबांतील माणसे त्वरित घराबाहेर पडली. काही वेळातच संपूर्ण घर कोसळले. मात्र, कोसळलेल्या घराखाली सर्व सामान अडकून त्याचे प्रचंड नुकसान झाले. बेघर झालेल्या कुटुंबांनी शासनाने आम्हाला त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)