मुलुंडमध्ये घराचा भाग कोसळून तीन जखमी

By Admin | Updated: July 30, 2015 02:22 IST2015-07-30T02:22:32+5:302015-07-30T02:22:32+5:30

सलग तीन दिवस अधून-मधून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मुंबई शहर आणि उपनगरात घडणाऱ्या पडझडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मंगळवारी मध्यरात्री मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलनीमध्ये

The house collapsed in Mulund and injured three | मुलुंडमध्ये घराचा भाग कोसळून तीन जखमी

मुलुंडमध्ये घराचा भाग कोसळून तीन जखमी

मुंबई : सलग तीन दिवस अधून-मधून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मुंबई शहर आणि उपनगरात घडणाऱ्या पडझडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मंगळवारी मध्यरात्री मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलनीमध्ये तळमजला अधिक एक असे बांधकाम असलेल्या घराचा भाग कोसळून तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. लक्ष्मीबाई राजगुरु, अजय राजगुरु आणि अभय राजगुरु अशी जखमींची नावे असून, मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रविवारी मध्यरात्री वाकोल्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू तर ५ जखमी झाले होते. सोमवारी मध्यरात्री वरळीमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जण जखमी झाले होते. त्यातील जखमींपैकी एकाचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. तर करण आंजर्लेकर यांना केईएमच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, सुनंदा डिसूजा यांना किरकोळ मार लागल्यामुळे उपचार करून घरी सोडून देण्यात आले. मंगळवारी गोरेगाव पश्चिमेकडील बांधकाम सुरु असलेल्या भिंतीचा भाग पडून मनिषा निकोजे, अविनाश निकोजे आणि निशा निकोजे यांना किरकोळ मार लागला. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

Web Title: The house collapsed in Mulund and injured three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.