Join us

परमबीर सिंह आणि सचिन वाझेमध्ये तासभर चर्चा, आता मुंबई पोलिस करणार या भेटीची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:13 IST

आज परमबीर सिंह आणि सचिन वाझे चांदीवाला कमिशनसमोर सादर झाले होते, यादरम्यान दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.

मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बड़तर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील बैठकीची चौकशी मुंबई पोलिसांकडून होणार आहे. दोघेही चांदीवाला आयोगासमोर हजर झाले होते, त्यादरम्यान दोघांची तासभर भेट झाली. दोघे कोणाच्या परवानगीने भेटले याचा पोलीस तपास करणार आहेत.

दोघांमध्ये तासभर चर्चा

सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपासपोलिस करत आहेत. 

टॅग्स :मुंबईपरम बीर सिंगसचिन वाझे