Join us  

हॉटस्पॉट : कोरोनाला मारतायेत फिरते दवाखाने  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 1:15 PM

फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून हॉटस्पॉट भागांमध्ये शीघ्र कृती उपक्रम अशा प्रयत्नांतून कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली आहे.

ठळक मुद्देरूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ५४ दिवसांवर पोहोचला.मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता १.३० टक्के असा झाला.आर मध्य विभाग वगळता इतर सर्व विभागातील रूग्णवाढीचा सरासरी दर २ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मुंबई : फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून हॉटस्पॉट भागांमध्ये शीघ्र कृती उपक्रम अशा प्रयत्नांतून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली आहे. विशेषत: धारावीसारखा परिसर एकवेळ हॉटस्पॉट म्हणून गणला जात होता, तिथे आता रूग्णांची संख्या कमी होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन आतापर्यंत ५ लाख ३८ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे. विविध परिसरांमध्ये ४४३ फिवर क्लिनीकच्या माध्यमातून तपासणी शिबीर घेऊन बाधितांचा शोध घेतला आहे.

संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवत महानगरपालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करु शकणारे ॲण्टीजेन टेस्ट युद्ध पातळीवर खरेदी करुन कोरोना चाचण्यांना अधिक वेग दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन प्रशासनाने चाचण्या केल्या असून, सुमारे १ लाख ॲन्टीजेन टेस्ट यामुळे होत आहेत. खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच प्रिस्क्रीप्शन शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३ जुलैपासून ॲण्टीजेन टेस्टचा उपयोग करण्यात येत असल्याने आता दैनंदिन चाचण्यांची संख्या ही ५ हजार ५०० पर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी ४ हजार चाचण्यांची संख्या आता वाढली आहे. बाधितांच्या कमी-अधिक संपर्कात असलेल्या अशा सुमारे १६ लाखांहून अधिक व्यक्तिंचा आतापर्यंत शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्यात आला आहे. यातील सुमारे १३ लाख ४४ हजारापेक्षा अधिक व्यक्तिंनी अलगीकरण (क्वारंन्टाईन) पूर्ण केले आहे.

............................

- ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली.- ११ मार्च रोजी पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला.- ३ फेब्रुवारी ते ६ मे या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.- १ जून रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.- २४ जून रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला.- ८ जुलैपर्यंत एकूण ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या झाल्या.

............................

- एकूण २४ विभागांपैकी १५ विभागात हा  सरासरी दर १.३० टक्के किंवा त्या पेक्षाही कमी आहे.- ५ विभागात १ टक्के पेक्षा कमी आहे.- आर मध्य मध्ये हा सरासरी दर २.५ टक्के असा आहे.

............................

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक