In the hospital to live, in the graveyard after death ... nothing but money! | जगण्यासाठी रुग्णालयात, अन्‌ मृत्यूनंतर स्मशानात... पैशांशिवाय काहीच नाही!

जगण्यासाठी रुग्णालयात, अन्‌ मृत्यूनंतर स्मशानात... पैशांशिवाय काहीच नाही!


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा विळखा कायम असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कोरोनाच्या नियमांना बगल दिली जात आहे. सॅनिटायर्झसचा पुरेपुर वापर करण्याकडे दुर्लक्ष करणे, सामाजिक अंतराच्या नियमास धूळीस मिळविणे आणि स्वच्छता तर नावाला नसणे; अशा अनेक समस्यांनी स्मशानभूमींना घेरले असून रूग्णालयापाठोपाठ आता स्मशानातही पैसे मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी मोफत अंत्यसंस्कार केले जातात, तर काही ठिकाणी लाकडाचे दर आकारले जातात. याशिवायदेखील काही ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याकरिता पैसे घेतले जात असून, जगण्यासाठी रूग्णालयात अन्‌ मरणानंतर स्मशानात पैशांशिवाय काहीच नाही, अशी अवस्था मुंबई सारख्या मायानगरीत देखील आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवरील अंत्यसंस्कारादरम्यान कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसविले जातात. एकही नियम पाळला जात नाही. सॅनिटायज होत नाही. मालाड येथे स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कोरोनाचे नियम पाळले जातात. कुर्ला येथे स्माशानभूमीमध्ये मृतदेहांवर संस्कार करताना कोरोनाचे नियम पाळले जातात. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते. जास्त लोकांना प्रवेश दिला जात नाही. सॅनिटायर्झस वापरले जाते. फक्त काही ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
येथे मात्र निष्काळजीपण बाळगला जातो. तर काही वेळेस पैशाची मागणी केली जाते. स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांना बगल दिली जात आहे. काही ठिकाणी नियम पाळले जात आहेत. लोअर-परळ, दादर असो वा आसपासचा परिसर असो. येथील स्मशानभूमीमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. येथे सॅनिटायर्झस नसतात. स्मशानभूमी सॅनिटायज केली जात नाही. 

मोफत अंत्यसंस्कार  केवळ नावालाच 
कुर्ला पश्चिमेकडील सोनापूर लेन येथील स्माशान भूमीत मृतदेह पुरण्याकरिता खड्डे खणण्याच्या कामाकरिता पैसे आकारले जात होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच मुंबई महापालिकेचा ‘एल’ विभाग खडबडून जागा झाला. एल विभागाने स्मशान भूमीत एक फलक लावला. येथील स्मशान भूमीमध्ये मृतदेह पुरण्याकरिता खड्डे खणण्याची सोय विनाशुल्क करण्यात आल्याचे त्यावर नमुद करण्यात आले. वीरशैव लिंगायत, जंगम, समाजातील मृतदेहांवरील अंत्य संस्कारांतर्गंत क्रिया करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली होती, असे मुंबईतील लिंगायत समाजाचे प्रतिनिधी राकेश पाटील यांनी सांगितले. तसेच दहन करताना महापालिकेचे नियमानुसार लागणारे शुल्क सध्या कोरोनाच्या काळात माफ करण्यात यावे. आणि मोफत सेवा देण्यात यावी.

पालिका प्रशासनाचे म्हणणे काय?
nतक्रार आली तर आम्ही कारवाई 
करू, याच्या पुढे महापालिका 
काहीच प्रतिक्रिया देत नाही.
n२१० स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अत्यंसंस्कार
nमुंबईत ४९ हिंदू स्मशानभूमी
n२० मुस्लिम दफनभूमी
n१२ ख्रिश्चन दफनभूमी
nखासगी २० हिंदु स्मशानभूमी
n५० मुस्लिम दफनभूमी
n३८ ख्रिश्चन दफनभूमी
n७ इतर धर्मीयांच्या स्मशानभूमी
n१० विद्युत दाहिनी आणि ४ स्मशानभूमी

आरोग्याची हेळसांड
nकोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांसह इतर मृतदेहांवर अत्यंसंस्कार करताना स्मशानभूमी अपु-या पडू नयेत म्हणून मुंबई महापालिका उपाय योजना करत आहे. विद्युत दाहिन्यादेखील मृतदेहांच्या 
अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जात आहेत. 
nएकंदर मुंबई शहर आणि उपनगरातील स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अत्यंसंस्कार केले जात असून, यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहांचा देखील समावेश आहे. कोरोनाच्या संकटात स्मशानभूमीमधील कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे, असा दावा पालिकेने केला आहे. मात्र स्मशानभूमीतील कर्मचा-यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

विद्युत दहनभूमी
चंदनवाडी, वैकुंठधाम, भोईवाडा, हेन्स रोड, शिवाजी पार्क, जोगेश्वरी येथील ओशिवरा, डहाणूकरवाडी, दौलत नगर, चरई, विक्रोळी येथील टागोर नगर या १० ठिकाणी विद्युत दहन भूमी आहेत.
गॅस शवदाहिनी
गॅस शव दाहिनीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यात डहाणूकरवाडी स्मशानभूमी, दौलतनगर स्मशानभूमी, चरई स्मशानभूमी, सायन स्मशानभूमीचा समावेश असून, उर्वरित स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरु करण्यात येत आहे.

येथील गर्दीही जीवघेणी
nमृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली जाते. काऊंटरवर सॅनिटायर्झस नसतात. प्रवेशद्वारवर कोण नसते. सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये कोणी नसते. जेथे पावती मिळते तिथे काहीच काळजी घेतली जात नाही.

नियमांचे पालन आवश्यकच
nमृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी किमान १५ ते २० लोक असतात. यामुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोराेनाला हरवणे शक्य आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In the hospital to live, in the graveyard after death ... nothing but money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.