वसईकरांच्या सेवेला 80 खाटांचे रुग्णालय
By Admin | Updated: August 16, 2014 22:43 IST2014-08-16T22:43:50+5:302014-08-16T22:43:50+5:30
गेली अनेक वष्रे वसई - विरार परिसरातील रहिवासी अत्याधुनिक इस्पितळाच्या प्रतिक्षेत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

वसईकरांच्या सेवेला 80 खाटांचे रुग्णालय
>वसई : गेली अनेक वष्रे वसई - विरार परिसरातील रहिवासी अत्याधुनिक इस्पितळाच्या प्रतिक्षेत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. वसई - विरार शहर मनपातर्फे नालासोपारा शहरातील तुळीज येथे बांधण्यात आलेल्या 8क् खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण आ. क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हितेंद्र ठाकूर उपस्थित होते.
वसई - विरार उपप्रदेशात सर डी. एम. पेटीट रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतू गेल्या काही वर्षात झालेली लोकसंख्या वाढ तसेच महानगर पालिकेचे आगमन अशा पाश्र्वभूमीवर अद्ययावत रुग्णालयाच्या मागणीने जोर धरला. मनपा प्रशासनाने अनेक अडचणीवर मात करत अवघ्या साडेचार वर्षात नालासोपारा शहराच्या पूर्वेस तुळीज येथे 8क् खाटांचे रुग्णालय उभारले. या रुग्णालयात 18 विभागांचा समावेश आहे. एकूण 16 हजार 868 चौ. फूट जागेत हे रुग्णालय उभारण्यात आले असून या बांधकामाच्या पहिल्या टप्प्याकरिता 5 कोटी 66 लाख रु. खर्च करण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळय़ात माजी आ. हितेंद्र ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले, आरोग्य सेवेचा दर्जा उत्तम रहावा तसेच रुग्णांना अल्पदरात सेवा मिळावी यासाठी प्रय} करण्यात येतील. या सोहळय़ास प्रभाग समिती सभापती भरत मकवाना, महापौर नारायण मानकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)