Join us  

आगीतील धुरात 21 मिनिटं तडफडत होती बाळं, CCTV फुटेजमधील वेदनादायी दृश्ये 

By महेश गलांडे | Published: February 10, 2021 12:19 PM

रुग्णालयातीत धुरांमुळे बाळं रडत होती, पण तिथे एकही नर्स पोहोचली नाही, हे सीसीटीव्ही फुटेजमधून पुढे आले आहे. रुग्णालयात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यावर बाळ ठेवलेल्या आयसीयूनेही पेट घेतला.

भंडारा - शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात अत्यवस्थ असलेल्या एका बालकाचा नागपूर येथे शुक्रवारी मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील कोका येथील सोनू मनोज मारबते यांचे ते बाळ होते. त्यामुळे, भंडार जळित दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या बाळांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर, दुसरीकडे भंडारा दुर्घटनेतील बाळांचा मृत्यू केवळ प्रशासनाच्याच बेजबाबदारपणामुळेच झाल्याचं उघड झालं आहे. तब्बल 21 मिनिटं बाळं धुरात तडफडत रडत होती, मात्र प्रशासन सुस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 

रुग्णालयातीत धुरांमुळे बाळं रडत होती, पण तिथे एकही नर्स पोहोचली नाही, हे सीसीटीव्ही फुटेजमधून पुढे आले आहे. रुग्णालयात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यावर बाळ ठेवलेल्या आयसीयूनेही पेट घेतला. पण, नर्सिंग स्टेशनमध्ये एकही नर्स उपस्थित नव्हती. यावेळी, आपली जबाबदारी ओळखून याठिकाणी नर्स असत्या, तर कदाचित या बाळांचा जीव वाचला असता. कलिनाच्या डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजने सीसीटीव्ही फुटेज तपासणीतून हा धक्कादायक निष्कर्श काढला आहे. दरम्यान, सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार गंभीर बेजबाबदारपणामुळे बाळं जिवाला मुकली आहेत. नर्सेसच्या अनुपस्थितीमुळे बाळांना जिवाला मुकावं लागलंय. या संदर्भात पोलीस अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट उपलब्ध आहे. पण, एफआयआर दाखल करण्यासाठी आणखी एका रिपोर्टची आवश्यकता असल्याचं सांगण्यात येतं आहे. 

अकरावे बाळही दगावले

मारबते यांच्या बालकाची तब्येत अत्यवस्थ असल्याने त्याला १६ जानेवारी रोजी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने १ फेब्रुवारीला घरी रवानगी करण्यात आली होती. मात्र, चार दिवसात प्रकृती पुन्हा खालावली. सतत रडत असल्याने त्याला पुन्हा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले. 

१६ जानेवारी रोजी या बालकाला नागपूरला हलविण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी ५ फेब्रुवारीला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. तपासणीनंतर बालकाला मृत घोषित करण्यात आले.- डॉ. पीयूष जक्कल, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा

बालकाला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजारअग्निकांडातून वाचलेल्या बाळांवर उपचार सुरू होते. त्यापैकीच मारबते या दाम्पत्याचा बालकही सहभागी होता. बालकाला श्वास घ्यायला त्रास होता, तर त्याच्या डोळ्यातून सतत पाणी यायचे. शरीरात कार्बनची मात्रा असल्यामुळे श्वसन संस्थेत त्रास होता. त्याला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :भंडारा आगमृत्यूसीसीटीव्ही