Join us

क्रीडासाहित्याचा सन्मान करा ! सचिन तेंडुलकर याचे आवाहन; आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 05:51 IST

आचरेकर सरांनी आम्हाला कायम या साहित्याचा सन्मान करण्यास शिकवले आणि त्यामुळेच आज मी यशस्वी ठरलो,' असे माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडोलकर याने सांगितले.

मुंबई : 'प्रत्येक खेळाडू हा खेळाच्या साहित्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असतो. त्यामुळे कायम खेळांच्या साहित्याचा सन्मान करावा. आज अनेक खेळाडू आपल्या अपयशाचे नैराश्य बॅट किंवा इतर साहित्य फेकून व्यक्त करतात. आचरेकर सरांनी आम्हाला कायम या साहित्याचा सन्मान करण्यास शिकवले आणि त्यामुळेच आज मी यशस्वी ठरलो,' असे माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडोलकर याने सांगितले.

सचिनने म्हटले की, 'माझा भाऊ अजित याने आचरेकर सरांच्या केलेल्या निरीक्षणामुळे मी त्यांच्याकडे आलो. आचरेकर सरांचे विद्यार्थी सामन्यादरम्यान कधीच दडपणात नसायचे. ते कायम गाणी गात, मजा मस्ती करत. त्याउलट जे सरांचे विद्यार्थी नव्हते, ते कायम दडपणात असायचे. ही बाब अजितने हेरली होती. सरांकडे सराव सामने खूप व्हायचे. . त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये कायम आत्मविश्वास असायचा.'

सचिनने पुढे म्हटले की, 'सरांन कधीच आमचे थेट कौतुक केले नाही. न बोलता खूप बोलून जायचे. त्यांच्य देहबोलीतून कळायचे की ते दुःखं आहेत की आनंदी. सामन्यानंत अनेकदा वडापावसाठी पैसे द्यायच् किंवा स्वतःहून भेळ वगैरे घेऊन द्यायचे तेव्हा कळायचे की सर खुश आहे आणि आपण काहीतरी चांगलं केलंय.

खरं तर हे स्मारक आधीच व्हायला पाहिजे होतं. आचरेकर सर म्हटलं की सचिन तेंडुलकर हे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतं; पण माझ्या मते जगात त्यांच्याहून अधिक खेळाडू कोणत्या प्रशिक्षकाने देशासाठी घडविले नसणार. आपल्याकडे पुतळे खूप झाल्याने मला येथे पुतळा नको होता; त्यामुळे आचरेकरांची ओळख होईल, अशा स्मारकासाठी पुढाकार घेतला. 

- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

टॅग्स :सचिन तेंडुलकरराज ठाकरे