प्रामाणिकपणे तिने केली पैशांची बँग परत

By Admin | Updated: January 6, 2015 22:05 IST2015-01-06T22:05:34+5:302015-01-06T22:05:34+5:30

जगात प्रामाणिकपणा उरलाच नाही, असे बिनदिक्कतपणे म्हणणाऱ्यांना लगाम लागावा असाच काहीसा प्रकार पाली शहरात घडला.

Honestly she returned to the bank of the money that she made | प्रामाणिकपणे तिने केली पैशांची बँग परत

प्रामाणिकपणे तिने केली पैशांची बँग परत

पाली : जगात प्रामाणिकपणा उरलाच नाही, असे बिनदिक्कतपणे म्हणणाऱ्यांना लगाम लागावा असाच काहीसा प्रकार पाली शहरात घडला. येथील प्रतिभा प्रकाश खांडेकर (३६) या महिलेने प्रामाणिकपणाची बाब कृतीतून दाखविली. तब्बल ९५ हजार रुपये असलेली उकिरड्यावर सापडलेली बॅग त्यांनी परत केली.
रात्रीच्यावेळी जेवल्यानंतर राहिलेले उष्टे टाकण्यासाठी त्या बाहेर गेल्या असताना कुत्रा एक बॅग फाडत असल्याचे त्यांना दिसले. त्यातून दहा, पन्नास आणि शंभर रुपयांचे पुडके बाहेर पडल्याचे प्रतिभातार्इंना दिसले. मात्र पैशाचा मोह बाळगून स्वत:च बॅग आणण्याचा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी तातडीने शेजारी असलेल्या निखील शिंदे, रोशन भिलारे यांच्या हे निदर्शनास आणले. त्या मुलांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून ही रोकड जमा केली. खांडेकर यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाची चर्चा पाली शहरात सर्वत्र झाली.
बिस्किटांची एजन्सी असलेले व्यापारी शैलेश माखेचा यांनी रात्री घरी जाताना गल्ल्यातील सर्व रक्कम बॅगमध्ये टाकली व दुकानाच्या पायरीवर बॅग ठेवून शटर बंद केले व बॅग विसरून घरी गेले. दुसऱ्या दिवशी पैसे उकिरड्यावर सापडल्याची चर्चा ऐकल्यावर माखेचा यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितले आणि ओळख पटवून आपले पैसे परत मिळवले. (वार्ताहर)

प्रतिभाचा सत्कार
हे पैसे ज्याचे असतील, त्यांना मिळाले पाहिजेत. आपल्यावर चांगले संस्कार असतील तर जी गोष्ट आपली नाही ती घेण्याचा लोभ होत नाही. हा प्रामाणिकपणा दाखविल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Honestly she returned to the bank of the money that she made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.