ओंबळे कुटुंबीयांची गृहराज्यमंत्र्यांनी घेतली भेट, आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:45 IST2017-11-25T23:44:27+5:302017-11-25T23:45:08+5:30
२६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेतली.

ओंबळे कुटुंबीयांची गृहराज्यमंत्र्यांनी घेतली भेट, आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन
मुंबई : २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना प्रशासनाच्या साहाय्याने आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
वरळी पोलीस कॅम्पमध्ये ओंबळे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून सुविधा वेळेवर पुरविल्या जातात की नाही, तसेच काही अडीअडचणी आहेत का, याबद्दल विचारणा केली. तसेच त्यांना प्रशासनाच्या साहाय्याने आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाहीदेखील पाटील यांनी दिली. याचबरोबर सुरक्षेचा आढावा घेतला.